राजेंद्र फडके, दुर्गादेवी देवस्थानने दिली 45 मुलींना शिष्यवृत्ती
गुहागर, ता. 28 : केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ गुहागर तालुक्यातील प्रत्येक मुलीला मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे. त्यामुळे या तालुक्यातील मुली स्वावलंबी, सक्षम होतील. असे प्रतिपादन बेटी बचाव, बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. दुर्गादेवी देवस्थानतर्फे 45 मुलींना 90 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमात फडके बोलत होते. या कार्यक्रमाला बेटी बचाव, बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

गुहागर वरचापाट येथील श्री दुर्गादेवी देवस्थान गेली 8 वर्ष बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानात काम करत आहे. दरवर्षी तालुक्यातील गरीब परंतु हुशार मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देवस्थानतर्फे केली जाते. देवस्थानच्या 15 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात तालुक्यातील 45 हुशार मुली आणि त्यांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीला 2 हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र फडके म्हणाले की, देशातील मुली संस्कारक्षम, स्वावलंबी, शिक्षित, सक्षम, असतील तर संपूर्ण देशाचे चित्र बदलेल. त्यासाठी गेली 8 वर्ष देशात बेटी बचाव, बेटी पढाव अभियान सुरु केले आहे. आज राजपथावर सैन्यांच्या संचलनाचे नेतृत्त्व महिला करतात. देशातर्फे केल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानाचे पुरस्कार महिलांना मिळण्याची संख्या वाढली आहे. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls
माता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर स्वाभाविकच मुली सक्षम होतील. त्यासाठी सुकन्या समृध्दी योजना सर्वोत्तम आहे. तालुक्यातील प्रत्येक मुलीला या योजनेत सामावून घेतले तर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, विवाहासाठी एक मोठी रक्कम 15 ते 20 वर्षांनी तिला मिळेल. सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थानी हे मिशन हाती घ्यावे. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे म्हणाले की, दुर्गादेवी देवस्थानने सुरु केलेली ही शिष्यवृत्ती योजना केवळ एकाच वेळेपुरती मर्यादित नाही. पहिली शिष्यवृत्ती देताना देवस्थानतर्फे तालुक्यातील मुलींची निवड केली जाते. मात्र दुसऱ्या वर्षी पासून पालकांनी आपल्या मुलीचे प्रगतीपुस्तक देवस्थानला पाठवायचे असते. मुलीची शैक्षणिक प्रगती होत असेल तर त्या मुलीला दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षीपासून उच्च शिक्षणाचा खर्च ही देवस्थानतर्फे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

या कार्यक्रमाला व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर नगरपंचायतीचे भाजप गटनेते उमेश भोसले, नगरसेवक गजानन वेल्हाळ, संजय मालप आदी उपस्थित होते. Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls
