कोकणातील पहिला एफएसटीपी प्रकल्प गुहागरात
गुहागर, ता. 21 : कोकण पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकार सलग्न असलेल्या एचएसबीसी बैंक पुरस्कृत सीडीडी इंडिया बेंगलोर या एनजीओ कपनीच्यावतीने गुहागर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडमध्ये एफएसटीपी (फिकत स्लज ट्रिटमेंट प्लांट) मल गाळ प्रक्रिया केंद्र उभारणी केले आहे. हा प्रकल्प कोकणातील एकमेव प्रकल्प ठरला असून गुहागरबरोबर मालवण येथेही या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. Dumping ground to be turned into nature park
सीडीडी इंडिया बैंगलोर या कंपनीच्यावतीने कोकणातील समुद्रकिनारी पर्यावरण संरक्षणाचे काम सुरु आहे. यातून त्या-त्या ठिकाणी होणाऱ्या वातावरण बदलाचे निरीक्षक व परीक्षण या कंपनीच्यावतीने केले जात आहे. यासाठी एचएसबीसी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य केले जात असून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. गेले काही महिने गुहागर शहरातील गटार, नाले यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये इ-कोलायचे प्रमाण दिसले होते. यामुळे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी व गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प जागा अधिक सुरक्षित असल्याने कोकणातील पहिला प्रकल्प गुहागर येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, गुहागर नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, अभियंता आशिष खांबे यांना बेगलोर येथे तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर गुहागर नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. Dumping ground to be turned into nature park

एफएसटीपी प्रकल्प हा शौचालयाच्या मैलापासून खत निर्मितीबरोबर त्यामधून वेगळे करण्यात येणाऱ्या पाण्याचा वृक्ष संवर्धनासाठी वापर केला जात आहे. याची क्षमता प्रती दिन ३ केएलडी असून गुहागर शहरातून संकलन होणाऱ्या शौचालयाच्या टाकीतील मैलाच्या प्रमाणानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एन्व्हॉर्मेट इंजिनिअरिंगवर आधारित सोलराईजचा वापर करण्यात आला आहे जेणेकरून या एफएसटीपी प्रकल्पामधील आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलावर जास्त उष्णता देऊन त्या मलाची कुजण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हनी वॅगनच्या सहाय्याने आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलापासून सोनखत निर्मिती केली जाणार आहे. तसेच यामधील पाणी फिल्टर करून या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जाणार आहे. मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी हा प्रकल्प गुहागरमध्ये आणण्यासाठी महत्वाची होणारे सोनखत व पाणी याचा वापर घनकचरा भूमिका बजावली आहे तर यातून तयार प्रकल्पात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे भविष्यात गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प हा एका उद्यानाप्रमाणे बहरणार आहे. प्रकल्पात शहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून ७ दिवसात ७० किलोपर्यंत कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. Dumping ground to be turned into nature park

सुखा कचऱ्याचे प्लास्टीक क्रश करून ते बाहेर पाठवले जाणार आहे. यामुळे गुहागरचा हा घनकचरा प्रकल्प कोकणासाठी दिशादर्शक ठरणार आहे. या एफएसटीपी प्रकल्पाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. यावेळी एचएसबीसी इडियाचे बँकेच्या उपाध्यक्ष रोमीत सेन, सीडीडी इंडिया बेंगलोरच्या हेड आदिती पांड्ये, सीडीडी इंडियाचे प्रोग्राम मॅनेजर इरफान उल्ला शरिफ, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण व गुहागर नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. Dumping ground to be turned into nature park