मनुष्यहानी नाही, प्रशाकीय अधिकाऱ्यांनी केली पहाणी
गुहागर : मोठ्या जहाजाला बांधलेले डम्प बार्ज तुटून भरकटत जयगडच्या समुद्रात लोकांनी पाहिले. त्यानंतर पालशेतमधील समुद्रकिनाऱ्यावर हे डम्प बार्ज वाहून आले. (Dump Barge on Palshet Beach) काही काळ मच्छीमार बोट बुडाल्याची अफवाही पसरली होती. सुरक्षेच्या सूचनेमुळे पालशेत समुद्रावरील बार्जबाबत कुतुहलही निर्माण झाले होते. मात्र सदर बार्जमध्ये मनुष्य नव्हता. तसेच कोणीही धोकादायक वस्तू नाही. असे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांनी प्रत्यक्ष पहाणीनंतर स्पष्ट केले. त्यामुळे विविध चर्चांना ब्रेक लागला आहे.

Dump Barge on Palshet Beach
मंगळवारी जयगड समुद्रात उलटे झालेले, सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे डम्प बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. (Dump Barge on Palshet Beach) हे जहाज दि. २२ जूनला कोलंबो येथून तेल घेऊन निघाले होते. या जहाजाला बांधलेले डम्प बार्ज अचानक तुटले. रविवारी (ता. १७ रोजी) रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड पासून १३ नॉटीकल मैल खोल समुद्रात होते. सकाळी ९.३०च्या दरम्यान हे डम्पबार्ज उलटे झाले. मंगळवारी ते बार्ज वहात पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यांवर येवून थांबले. पालशेत समुद्रकिनाऱ्यावर नदी समुद्राला येवून मिळते त्या ठिकाणी डम्पबार्ज थांबले आहे. भरतीमुळे त्याच भागात ते मागे पुढे होत आहे.

अफवा आणि कुतहूल
हा अपघात पहाणाऱ्यांना सुरवातीला मच्छीमार बोट बुडाली असावी. असा संशय आला. त्यामुळे जयगड ते पालशेत दरम्यान अफवांना पेव फुटले. काही माणसांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. जयगडला बुडालेली मच्छीमार नौका पालशेतच्या किनाऱ्याला आली. पालशेतला मच्छीमार नौका बुडाली. अशा वेगवेगळ्यात अफवा दोन तास सामाजिक माध्यमांवर पसरल्या होत्या. शासकीय यंत्रणांनी किनाऱ्यावरील नागरिकांन सतर्कतेचा इशारा दिला. किनाऱ्यावरील स्थानिक मच्छीमारांनी वाहून आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयास्पद आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे या डम्पबार्जबद्दल कुतुहलही निर्माण झाले. (Dump Barge on Palshet Beach)

अधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान तहसीलदार प्रतिभा वराळे, मंडळ अधिकारी श्री. मोरे यांनी किनाऱ्यावर जाऊन बार्जची पाहणी केली. त्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांनी आपल्या अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन किनारी लागलेल्या बार्जची पाहणी केली. या संदर्भात माहिती देताना प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले म्हणाले की, पालशेतच्या किनाऱ्यावर आलेले डम्पबार्ज (Dump Barge on Palshet Beach) हे एका मोठ्या जहाजाबरोबर टोईंग करण्यात आले होते. खोल समुद्रात टोईंग करणारा दोर तुटल्याने हे डम्पबार्ज भरकटले. त्यावर कोणीही खलाशी नव्हता किंवा अन्य सामानही नव्हते. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या मोठ्या जहाजाची माहिती मिळवली आहे. त्यांना डम्पबार्ज भरकटून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता सदर जहाजाच्या मालक कंपनीची विमा कंपनी घटनास्थळी येवून या संबंधीचा अहवाल तयार करेल. त्यानंतर संबंधित कंपनी हे डम्पबार्ज घेवून जाईल. तोपर्यत ते भरकटून आणखी कुठे जावू नये. याची दक्षता घेण्यास कंपनीला सांगण्यात आले आहे.
पालशेत समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या Dump Barge चा व्हिडिओ पहा.
