विदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा
Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan Beaches) कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्यामध्ये चरस या अंमली पदार्थाची 18 पाकीटे होती. त्यांचे वजन 21 किलो 85 ग्रॅम इतके होते. गेल्या सात दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सुमारे 222 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती बोऱ्या कस्टमचे अधिक्षक जय कुमार यांनी दिली आहे.
Drug packets on Konkan Beaches
14 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे ते लाडघर दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर बेवारस स्थितीत 10 पाकिटे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सदरची पाकिटे जप्त करुन माहिती घेतली असता त्यामध्ये 11.88 किलो अफगाणी चरस असल्याचे आढळून आले. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दापोली तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर (Konkan Beaches) गस्त घालण्यास सुरवात केली. यामध्ये 15 ऑगस्टला कर्दे ते लाडघर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर 34.91 किलो चरस असलेली पाकिटे सापडली. 16 ऑगस्टला केळशी समुद्रकिनाऱ्यावर 24.99 किलो वजनाची पाकीटे तर कोळथरे येथील समुद्रकिनाऱ्यावर 13.04 किलो चरस असलेली पाकिटे समुद्रकिनाऱ्यावरुन सीमाशुल्क विभागाने जप्त केली. 17 ऑगस्टला मुरूड (ता. दापोली) येथील समुद्रकिनाऱ्यावर 14.41 किलो चरस सापडला. तर त्याच दिवाशी बुरोंडी ते दाभोळ किनाऱ्यादरम्यान तब्बल 100.95 किलो चरस सापडला. 19 ऑगस्टला गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथे 21.85 किलो चरस सीमाशुल्क विभागाने जप्त केला. Drug packets on Konkan Beaches
Drug packets on Konkan Beaches
या संदर्भात बोलताना सीमाशुल्क विभागाचे बोऱ्या क्षेत्राचे अधिक्षक जय कुमार (Superintendent Of Customs Mr. Jai Kumar) म्हणाले की, रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर एकूण 17 गोणी सापडल्या त्यामध्ये निळ्या रंगाची पाकिटे होती. बोऱ्या येथे 2 गोणी आढळून आल्या. त्यामध्ये 18 निळ्या रंगाची पाकिटे होती. आजपर्यंत दापोली आणि गुहागर तालुक्यातील 7 समुद्रकिनाऱ्यावरुन 222.03 किलो चरस (Drug) जप्त करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घातली जात आहे. आमचा अंदाज आहे की, अजुनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ समुद्रकिनाऱ्यांवर सापडतील. जर निळ्या रंगाची पाकीटे किंवा कोणत्याही रंगाच्या गोणी समुद्रकिनाऱ्यावर सापडल्या तर त्याची माहिती समुद्रकिनारी रहाणाऱ्या जनतेने सीमा शुल्क विभागाला द्यावी. 7888111184 किंवा 7827980605 या मोबाईल क्रमांकावर गांव व ठिकाणाचा तपशील दिल्यास आम्ही त्या ठिकाणी येवून बेवारस पडलेली पाकीटे ताब्यात घेऊ. अशी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण व विश्र्वासार्ह माहिती दिल्यास बक्षिसही देण्यात येईल. Drug packets on Konkan Beaches
चरसांच्या पाकीटांचे विदेशी कनेक्शन
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी सापडलेल्या अंमली पदार्थांची पाकीटे (Drug packets on Konkan Beaches) गुजरातमध्ये सापडलेल्या पाकिटांशी मिळतीजुळती आहेत. त्यामुळे गुजरात पोलीसांशी संपर्क साधण्यात आला आहे. सदरचा अंमली पदार्थ (Drug) हा अफगाणी चरस असून तो विदेशी जहाजांमधुन पडला असावा आणि समुद्रातून वाहत कोकणच्या किनारपट्टीवर आला असावा असा अंदाज आहे. पोलीस सर्व बाजुंनी तपास करत आहेत. कोकण किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमा शुल्क विभागाप्रमाणेच पोलीस, दहशवाद विरोधी पथक, श्र्वान पथक अशा यंत्रणा तपास करत आहेत. अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी (Superintendent Of Police Mr. Dhananjay Kulkarni) यांनी पत्रकारांना दिली आहे. Drug packets on Konkan Beaches
गुहागर न्यूजचे आवाहन
कोकण किनारपट्टीवर कोणालाही अशी बेवारस पाकिटे, गोणी सापडल्या (Drug packets on Konkan Beaches) तर त्याची माहिती पोलीस, सीमाशुल्क विभागाला द्यावी. या संपूर्ण प्रकरणाचा तपास विविध यंत्रणा करत आहेत. जर यामागे तस्करीचा उद्देश असेल तर कोणी अनोळखी व्यक्ती किनारपट्टीवरील बेवारस वस्तु आपल्या घरात ठेवण्याचे आमिष दाखवू शकतात. अशा आमिषाला बळी न पडता याची माहिती द्यावी. चुकूनही अशी वस्तू सागरी सीमेवरील गावांमध्ये आढळून आली तर संबंधित व्यक्तिवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे कोणीही माहिती लपवून ठेवू नये.