वाहतुक पोलिसांच्या कारभाराने वाहनचालक त्रस्त
गुहागर, ता. 22 : वाहतुक शाखेचे नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावताना वाहन एकाचे आणि कारवाई दुसऱ्यावर अशी उदाहरणे समोर येत आहे. चुकीच्या पध्दतीने झालेल्या कारवाईसाठी सामान्यजनांना मात्र लोकअदालत किंवा न्यायालयात जाण्याचे निर्देश वाहतुक पोलीसांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. Drivers suffer due to traffic police


देवरुखमध्ये एमएच 09 एयु 1908 या गाडीचा फोटो वाहतुक पोलीसांनी काढला. मात्र सदर दुचाकीचा गुन्हा एमएच 08 एयु 1908 या वाहनावर नोंदविण्यात आला. लोटे येथे महामार्गावरुन तीन सीट घेवून जाणाऱ्या वाहनचालकाचा फोटो वहातुक पोलीसांनी काढला. मात्र सदरचा गुन्हा गुहागरमधील एका वाहनावर नोंदण्यात आला. अरुंद रस्त्यावर वहातुकीची कोंडी होवू नये म्हणून एका चारचाकी वाहनचालकाने आपले वाहन मंत्री महोदयांच्या ताफ्यात नेले. त्या वाहनचालकाला वेगाने वाहन चालविल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Drivers suffer due to traffic police


वाहनासंदर्भातील वहातुक पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. ज्यांनी दंड भरला ते सुटले. पण ज्यांनी अद्याप दंड भरलेला नाही त्या केसेस 7 मे रोजी लोक अदालतीद्वारे सोडविण्याचा प्रयत्न थेट पोलीस अधिक्षक कार्यालय आणि विधी सेवा प्राधिकरणमार्फत होत आहे. यासंबधीचे पत्र एका संदेशाद्वारे वाहनचालकांना पाठविण्यात आले आहे. Drivers suffer due to traffic police
या पत्रामुळे हे प्रकार उघडीस आले आहेत. या संदर्भात संबंधित वाहनचालकांनी पोलीस ठाण्यात चौकशी केली. फोटोतील वाहन आणि नोटीसीमधील वाहन क्रमांक चुकीचा असल्याचेही दाखवून दिले. मात्र ही प्रक्रिया ऑनलाइन झालेली असल्याने आम्ही काहीच करु शकत नाही. तुम्हाला लोक अदालतीमध्ये किंवा संबंधित पोलीसाकडे जावूनच या तक्रारीचे निराकरण करावे लागेल. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहे. चुकीच्या कारवाईमध्ये निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी आम्हालाच का भुर्दंड असा प्रश्र्न सध्या या वाहनचालकांना पडला आहे. Drivers suffer due to traffic police
पकडलेल्या वाहनाचा क्रमांक लिहिताना चुक करुन वाहतुक पोलीस निरपराधांना वेठीस धरत आहेत. हे चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालुन निरपराधांना संरक्षण द्यावे. निरपराध वाहनचालकांना लोकअदालतीत हजर रहाण्याचा धाक दाखवू नये.
सत्यवान घाडे, वाहनचालक