• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काँग्रेस का हाथ, भ्रष्ट परिवार के साथ

by Ganesh Dhanawade
June 15, 2022
in Politics
16 0
0
Dr. Vinay Natu's attack

उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू

32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा हल्लाबोल

गुहागर, ता.15 : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. (Associated Journal Ltd.) या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे डॉ विनय नातू यांनी केले आहे. Dr. Vinay Natu’s attack

भ्रष्टाचारास पाठीशी घालणाऱ्या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. भ्रष्टाचार आणि असत्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सत्याग्रहाचा मुलामा चढवून काँग्रेसने महात्मा गांधींच्या मूल्यांना मूठमाती दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आले होते. त्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे (Associated Journal Ltd.) ‘नॅशनल हेराल्ड’ (National Herald) हे वृत्तपत्र चालविल्यात आले होते. याकरिता देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन केली. केवळ ५० लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुनावणीकरिता राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण केले. गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता सत्याग्रह आंदोलन सुरू केले. जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे. भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही डॉ. नातू यांनी दिला आहे. Dr. Vinay Natu’s attack

राष्ट्रीय भावनेतून स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आपल्या घामाचा पैसा ओतून नॅशनल हेराल्ड उभारले होते. या वृत्तपत्राचा गळा घोटून गांधी परिवाराने या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोलाने घशात घातली. या आरोपावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी जामीनावर मोकळे असलेल्यांनी आपल्या बचावासाठी पक्षाला वेठीस धरून आंदोलन करण्याचा आदेश देत आहेत. दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्य जनतेसमोर आल्याने आता भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले. Dr. Vinay Natu’s attack

राष्ट्रीय कार्यासाठी उभारण्यात आलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीचे रियल इस्टेटच्या धंद्यात परिवर्तन करण्याचा गांधी परिवाराच्या भ्रष्ट कमाईचा डाव उघड झाला आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे या प्रकरणातून वेशीवर टांगली गेली आहेत. केवळ गांधी परिवारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या काँग्रेसजनांना असत्य आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यातच अधिक रस असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने स्वतःच आपल्या विसर्जनाचा उत्सव सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. गांधी परिवारापुढे गुडघे टेकून देशाला वेठीस धरणाऱ्या ‘काँग्रेसका हाथ भ्रष्ट परिवार के साथ’ आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे, असे ते म्हणाले. Dr. Vinay Natu’s attack

Tags: Associated Journal Ltd.BJPCongressDr. Vinay NatuDr. Vinay Natu's attackFreedom FighterGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahatma GandhiMarathi NewsNational HeraldNews in GuhagarPatriotकाँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यानॅशनल हेराल्डभाजपमराठी बातम्यामहात्मा गांधींलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.