गुहागर, ता. 26: तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शंतनू जोशी (वय 42) यांचे सोमवारी (ता. 25) सायंकाळी 4.30 वाजता पुणे येथे निधन झाले. गेले दोन महिने ते दुर्मिळ, असाध्य आजारावर उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. Dr. Shantanu Joshi is No More

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांचे चिरंजीव डॉ. शंतनु जोशी नरवण येथे गेली 15 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. गेले दोन महिने ते तापाने आजारी होते. सतत येणाऱ्या तापामुळे त्यांना डेरवण यांच्या येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक तपासण्यांसाठी त्यांना गोकुळाष्टमी दरम्यान पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अत्याधुनिक चाचण्या घेतल्या गेल्या. त्यावेळी ह्रदयातून शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करणार्या मुख्य रक्तवाहीनीला संसर्ग झाल्याचे समोर आले. या संसर्गाचे कारण शोधताना ह्रदयातून मुख्य रक्तवाहिनी सुरु होते त्याचठिकाणी एक फुगा असल्याचे निष्पन्न झाले. हा दुर्मिळ व असाध्य रोगावर उपचार करण्यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घेतला जात होता. मात्र सोमवारी (ता. 25) रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सदरचा फुगा फुटला आणि ह्रदय क्रिया (हार्टफेल) थांबली आणि डॉ. शंतनू यांची प्राणज्योत मालवली. Dr. Shantanu Joshi is No More

अवघ्या 42 व्या वर्षी डॉ. शंतनु यांचे निधन झाल्याने नरवण गावाबरोबर तालुक्यासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह नरवण येथे आणण्यात आला. मंगळवारी सायंकाळी नरवण येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे, दीपक पटवर्धन, र. जि. म. बॅकेचे अन्य संचालक, भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, उपाध्यक्ष रामदास राणे, गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर नगरपंचायतीची माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामचंद्र हुमणे गुरुजी, प्रदीप बेंडल, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूणचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आदी मान्यवर या दुःखद प्रसंगी नरवणमध्ये उपस्थित होते. Dr. Shantanu Joshi is No More
