गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्त गरजू व गरीब रुग्णाला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या शृंगारतळीतील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांचा त्यांच्या विष्णुपंत पवार मेमोरियल हॉस्पिटल येथे जाऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. Dr. Rajendra Pawar felicitated on behalf of MNS


शृंगारतळी येथील नामवंत डॉ. राजेंद्र पवार हे गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. गुहागर तालुक्यामध्ये कुठेही अपघात झाला तर त्या रुग्णांना प्रथम रुग्णसेवा देण्याचे काम डॉ. राजेंद्र पवार आज अनेक वर्षे करत आहेत. रात्री अपरात्री कोणताही रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यास त्यांना ते चांगली वैद्यकीय सेवा देत आहेत. मनसे गुहागरच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अभिजीत रायकर उपस्थित होते. Dr. Rajendra Pawar felicitated on behalf of MNS