गुहागर, ता. 12 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हानेचे (Dr. Tatyasaheb Natu College of Arts and Senior Commerce, Margatamhane) प्राचार्य डॉ. विजयकुमार आ. खोत हे त्यांच्या नियत वयोमानाप्रमाणे गुरुवार दि. 31/03/2022 रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. ते 20/10/2000 रोजी या महाविद्यालयात प्राचार्य पदावर रुजू झाले होते. सदर पदावर त्यांची सेवा 21 वर्षे 5 महिने इतकी झाली असून त्यांची एकूण सेवा सन 1983 ते 2022 असा प्रदीर्घ 40 वर्षांची झाली असून ते सन 1983 मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयासह एम. ए. उत्तीर्ण झाले व त्वरित 05-10-1983 रोजी सोनोपंत दांडेकर कॉलेज पालघर जि. पालघर येथे इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त झाले. तद्नंतर सन 1985 ते 2000 दरम्यान ते सौ. सीताबाई रामकृष्ण करंदीकर कॉलेज डहाणू जि. पालघर येथे वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक पदावर निवडले गेले. Dr. Natu College. Retirement of Khot


याच दरम्यान सन 1992 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम. फिल. पदवी इंग्रजीमध्ये प्राप्त केली. तसेच त्यांना लायन्सक्लब ऑफ डहाणू यांच्यामार्फत 1998 मध्ये बेस्ट टीचर अवार्डने सन्मानित केले गेले. तद्नंतर सन 2000 मध्ये 10 ऑक्टोबर रोजी डॉ. नातू महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर रुजू झाले. Dr. Natu College. Retirement of Khot


त्यांच्या कार्यकालामध्ये “राष्टीय मुल्यांकन एवं परिषद, बंगलोर” मार्फत सन 2004 मध्ये क (C) श्रेणी, सन 2011 मध्ये ब (B) श्रेणी, वसन 2017 मध्ये ब + (B+) श्रेणी प्राप्त झाली. याच कालावधीत सन २०११ मध्ये संस्थेने वाणिज्य शाखा सुरु केली, त्याची ही प्रगती सुरु आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. Dr. Natu College. Retirement of Khot
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक विभागीय क्रीडा, सांस्कृतिक व संशोधन स्पर्धा व राष्ट्रीय सेवा योजना इ. मधील सहभाग व यश उल्लेखनीय आहे. त्यामुळे कोकण परिसरातील एक प्रतिथ यश महाविद्यालय म्हणून डॉ. नातू कॉलेज ओळखले जाते. Dr. Natu College. Retirement of Khot
सन 2017 मध्ये प्राचार्य पदी असताना डॉ. विजयकुमार खोत यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची इंग्रजी विषयातील विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केली. याच वर्षी श्री. गणेश मंडळ, चिपळूण मार्फत त्यांचा याबद्दल विशेष पारितोषिकाने सत्कार करण्यात आला. सन 2018 मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सोशल अंडइकॉनॉमिकरी फार्मस बंगलोर मार्फत“ लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड” ने त्यांना सन्मानित केले गेले. तर 2019 मध्ये“ स्वप्नपूर्ती फौंडेशन, सांगली” मार्फत त्यांना गुरुभूषण पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, शासनप्रतिनिधी, कुलगुरू प्रतिनिधी, प्राध्यापक व प्राचार्य निवड समित्यांवरही ते कार्यरत होते. Dr. Natu College. Retirement of Khot
अशा प्रकारे प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांची यशस्वी सेवा गुरुवार दि. 31 मार्च 2022 रोजी त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीने संपुष्टात आली असून संस्थेकडून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी कडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. Dr. Natu College. Retirement of Khot