गुहागर, ता. 13 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभेमध्ये वेलदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुंभार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Dr. Kumbhar felicitated by Veldur Nawanagar
सदर सभेमध्ये डॉ कुंभार यांनी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, त्याचा परिचय, सदर लसीचे उद्दिष्ट, एचपी व्ही लसीकरण याबाबत उपस्थितांना व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी शंकर कोळथरकर, मारुती रोहीलकर, मनोज पावस्कर मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. Dr. Kumbhar felicitated by Veldur Nawanagar

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण रोहीलकर म्हणाले की, या शाळेचा मला अभिमान वाटतो. प्राथमिक शिक्षण हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया आहे व या शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी घडले असून आज स्वतःच्या पायावरती उभे राहिले आहेत. अनेक सन्मानाच्या पदावर विराजमान झाले आहेत. Dr. Kumbhar felicitated by Veldur Nawanagar
शिक्षण तज्ञ सदस्य श्री शंकर कोळथरकर, युवा नेते मनोज पावसकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, ग्राम. सदस्या प्राजक्ता जांभरकर, उपाध्यक्ष रवींद्र जांभरकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, आरोग्य सेविका किल्लेकर, आशा सेविका सोनाली वनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले. Dr. Kumbhar felicitated by Veldur Nawanagar