विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे : पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा
रत्नागिरी, दि. 24 : भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी. त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये. यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. Dr. Gorhe visited historical places.
Dr. Gorhe visited historical places
तीन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधान परिषदेच्या उप सभापती (Deputy Speaker of The Legislative Council) डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांचे जन्मस्थान असणाऱ्या टिळक स्मारकास भेट दिली. त्यांनी या वाड्याची पाहणी केली. मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
रत्नागिरी कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जतन केलेल्या कक्षासही त्यांनी भेट दिली. तेथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर ऐतिहासिक महत्व असणाऱ्या पतित पावन मंदिरात( Patit Pawan Mandir ) जावून दर्शन घेतले.
त्यानंतर डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) म्हणाल्या की, भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. जतन करताना त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये. टिळक स्मारक येथे असणारा वाडा जतन करण्यास रत्नागिरीत तज्ञ निश्चितपणे आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबाबत पुरातत्व विभागाकडून अहवाल घेतला आहे.
टिळकांचे जन्मस्थान असणारे हे स्मारक तसेच त्यांचा पुणे येथील वाडा आणि लोकमान्य टिळकांचे चरित्र भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. या वास्तुचे जतन करण्यात पुरातत्व खात्यास काही अडचणी असल्या तरी समन्वय आणि पाठपुरावा यातून सकारात्मक बदल निश्चितपणे होईल. याबाबत पालकमंत्री ॲङ अनिल परब (Adv. Anil Parab) तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अहवाल देवू व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनात याबाबत पुढील काम करुया. (Dr. Gorhe visited historical places)