• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित

by Mayuresh Patnakar
March 8, 2023
in Guhagar
224 3
0
हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित
441
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायतीत नागरिकांचा खोळंबा

Guhagar News, ता. 8 : नगरपंचायत कार्यालयात जनतेला हरकती नोंदवण्यासाठी नेमलेला अधिकारी बुधवारी दुपारपासून नगरपंचायतीकडे फिरकलाच नाही. DP Plan Officer absent in Guhagar NP. त्यामुळे विकास आराखड्याची माहिती घेण्यासाठी व हरकती नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांना दोन तास वाट पाहून माघारी फिरावे लागले. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही फोन संबंधित अधिकाऱ्याने उचलले नाहीत. अशी माहिती समोर आली आहे. यावरुन वातावरण तापले आहे हे समजाताच सायंकाळी 6 वा.हे अधिकारी नगरपंचायतीत हजर झाले.

सध्य विकास आराखड्यामुळे (Development Plan) गुहागर मधील वातावरण गढूळ झाले आहे. नोकरी, उद्योग व व्यवसायामुळे बाहेरगावी राहणाऱ्या नागरिकांना आपल्या जागेवर आरक्षण आहे कायाची माहिती नाही. नागरिकांना आरक्षणावर हरकत घेण्यासाठी सर्व्हे क्रमांक, आरक्षण क्रमांक, समितीला समजले अशा भाषेत हरकत कशी लिहायची. याची माहिती घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नगरपंचायतीत येतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगरपंचायतीमध्ये गायकवाड नावाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर अधिकारी शहर विकास आराखडा, त्यातील आरक्षणे कोणत्या जमिनीवर आहेत, त्या जमिनीचा तपशील, आदी माहिती नागरिकांना देतात. हरकत कशी नोंदवावी याचेही मार्गदर्शन करतात. DP Plan Officer absent in Guhagar NP
बुधवार (ता.8) सकाळच्या सत्रात नागरिकांना माहिती दिल्यानंतर भोजनाच्या सुट्टीत गायकवाड नगरपंचायतीतून बाहेर पडले, ते पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलेच नाहीत. काही नागरिक दुपारी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत नगरपंचायत कार्यालयात हरकती नोंदवण्यासाठी, हरकतींची माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांची आणि गायकवाड या अधिकाऱ्याची भेटच होऊ शकली नाही. नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. म्हणून अखेर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी देखील गायकवाडांना दूरध्वनीवरून संपर्क केला. मात्र तो फोन देखील गायकवाड यांनी उचलला नाही. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये आलेले नागरिक संतप्त झाले होते. DP Plan Officer absent in Guhagar NP
याबाबत बोलताना नगरसेवक समीर घाणेकर म्हणाले की, आज अनेक नागरिक आपल्या जागेवर आरक्षण नको म्हणून गुहागर नगरपंचायतीत येत आहेत. मात्र एक नागरिक सनसेट पॉईंटचे आरक्षण माझ्या जागेत असेल तर मला हवे आहे, असे सांगण्यासाठी नगरपंचायतीत आले होते. मात्र सदरचे आरक्षण त्यांच्याच जागेत आहे का याची निश्चित माहिती अधिकारी नसल्याने मिळू शकली नाही. हे आमचे दुर्दैव आहे.
भाजपचे उपाध्यक्ष किरण खरे हे देखील विकास आराखड्यातील काही आरक्षणाची तपशिलात माहिती घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आले होते. अडीच ते साडेपाच असे तीन तास किरण खरे नगरपंचायतीत बसून होते. मात्र गायकवाड हे नगरपंचायतीत आले नाहीत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे किरण खरे यांनी तक्रार केली. त्यावर गुरूवारपासून दररोज एक अधिकारी कार्यालयीन वेळेत विकास आराखड्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित असेल. असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे. DP Plan Officer absent in Guhagar NP

दरम्यान नागरिकांचा दबाव वाढल्याचे लक्षात आल्यावर सायंकाळी 6.00 वा. गायकवाड गुहागर नगरपंचायतीत हजर झाले. त्यानंतर रात्री 8.00 वाजेपर्यंत ते नागरिकांना मार्गदर्शन करत थांबले होते.

Tags: DP Plan Officer absent in Guhagar NPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.