सखी महिला प्रभाग संघ, पडवे
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 08 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत सखी महिला प्रभाग संघ पडवे येथील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळाचे उद्या पासून आबलोली बाजारपेठेत भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ ते शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ असे तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन व फराळ विक्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. Diwali Faral Display and Sale at Abaloli
गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेत श्री.चंद्रकांतशेठ बाईत यांच्या दुकाना समोरील मैदानात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सखी महिला प्रभाग संघ पडवे या प्रभाग संघाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल दर्जेदार घरगुती फराळ व विवीध वस्तूंचे दिवाळी फराळाचे भव्य दिव्य प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य दिवाळी फराळातील दर्जेदार उत्पादने १)खमंग चकली २) खुसखुशीत चिवडा ३) विवीध प्रकारचे लाडू ४) अनारसे ५) करंजी ६) शंकरपाळे ७) बोरं ८) पणत्या व अॅक्रालिक रांगोळी ९) शोभिवंत फूले १०) मिक्स मसाला / गावठी हळद ११) सर्व सरबते, तळलेले गरे, आवळा कॅन्डी व इतर पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. Diwali Faral Display and Sale at Abaloli
तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने बहूसंख्येने उपस्थित राहून ग्रामिण भागातील सखी महिला प्रभाग संघ पडवे या प्रभाग संघाच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांच्या भव्य दिव्य प्रदर्शनास व विक्री महोत्सवास भेट देऊन दिवाळी फराळ खरेदी करा व महिलांच्या उन्नतीसाठी आधार द्या. व भेसळमुक्त फराळाचा आस्वाद घ्या असे जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती गुहागर, सखी महिला प्रभाग संघ पडवे यांनी केले आहे. Diwali Faral Display and Sale at Abaloli