23 दिव्यांगाना धनादेश व दोन दिव्यांगांना दिल्या व्हिल चेअर
गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीतर्फे दिव्यांग मेळाव्याचे (Empowerment of Persons with Disabilities) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 2 दिव्यांगाना व्हिल चेअर आणि 23 दिव्यांगांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यामध्ये नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना आणि बचत गटाचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुहागर शहरातील भंडारी भवन येथे हा मेळावा झाला. Divyangajan Empowerment Meet


नगरपंचायतीला प्रत्येक आर्थिक वर्षात स्वनिधीमधील ५ टक्के रक्कम दिव्यांगांवर खर्च करावी लागते. आर्थिक वर्ष 2021-2022 मधील 85 हजार 100 रुपयांचा निधी गुहागर नगरपंचायतीला दिव्यांगांसाठी खर्च करायचा होता. त्यासाठी नगरपंचायतीने अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरावर झाली. त्यातून गुहागर नगरपंचायतीमधील 23 दिव्यांग व्यक्ती लाभार्थी ठरल्या. या सर्वांना प्रत्येकी 3700 रुपयांचा धनादेश दिव्यांग मेळाव्यात सन्मानपूर्वक देण्यात आला. (Empowerment of Persons with Disabilities)
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्रतर्फे (Empowerment of Persons with Disabilities) दिव्यांग सहाय्य योजना (ADIP Scheme) राबविण्यात आली होती. या योजनेमधुन गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील उमेश सुधाकर माचिवले वरचापाट दुर्गादेवीवाडी आणि चंद्रशेखर शंकर लोखंडे जांगळेवाडी या दिव्यांगाना व्हिलचेअर मंजुर झाल्या होत्या. नगरपंचायतीने आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्यात या व्हिलचेअर त्यांना देण्यात आल्या. Divyangajan Empowerment Meet


या मेळाव्यात शरीफ मुजावर, चिपळूण यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगजनांना कोणत्या योजनांचा लाभ घेता येतो याची माहिती दिली. तर सुचिता आंबोकर यांनी गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांगजनांना बचत गट स्थापन करण्याची विनंती केली. दिव्यांगजनांना शासकीय योजनांचा लाभ घेवून बचतगटाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत. याचेही मार्गदर्शन केले. तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी नगरपंचायत क्षेत्रातील अपंग कार्यकर्त्यांनी नवीन समिती स्थापन करावी. असे आवाहन केले. Divyangajan Empowerment Meet
या मेळाव्याला गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले, भाजपचे गटप्रमुख उमेश भोसले, नगरसेविका सौ. स्नेहा भागडे, सौ. सांगळे, नगरसेवक माधव साटले, समिर घाणेकर, गजानन वेल्हाळ, संजय मालप, चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसच्या सौ. संगीता भाटकर, नगरपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी पेढांबकर आदी उपस्थित होते. Divyangajan Empowerment Meet मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतीचे कर्मचारी संदेश असगोलकर, जनार्दन साटले, सुनिल नवजेकर, महेश कदम, समर्थ भोसले व ओंकार लोखंडे यांनी मेहनत घेतली.