गाडीला 26 स्थानकांवर थांबा, वेळापत्रकात बदल
गुहागर, ता. 24 : कोकण रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर फळास आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यानची मेमू लोकल सेवा कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या गाडीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. Diva-Chiplun MEMU Local Permanent
कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि माणगाव, गोरेगाव, वीर तसेच चिपळूण परिसरातील नागरिकांकडून या लोकल सेवेसाठी सातत्याने मागणी होत होती. अनेकदा ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्टपासून मध्य रेल्वेने दिवा-चिपळूण मेमू लोकल तात्पुरती सुरू केली होती. त्या काळात प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रेल्वे प्रशासनाने अखेर ही सेवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून दिवा ते चिपळूण मेमू लोकल सेवा नियमित धावणार आहे. Diva-Chiplun MEMU Local Permanent

दोन मेमू गाड्या या मार्गावर चालणार असून, पहिली गाडी दिवा स्थानकातून सकाळी ७.१५ वाजता सुटून चिपळूणला पोहोचेल, तर दुसरी गाडी चिपळूणहून दुपारी १२.०० वाजता सुटून दिवा स्थानकाकडे रवाना होईल. ही मेमू लोकल दिवा ते चिपळूणदरम्यान एकूण २६ स्थानकांवर थांबणार असून, पनवेल, पेण, रोहा आणि माणगाव या प्रमुख जंक्शनवर क्रॉसिंगसाठी अधिक वेळ थांबा दिला जाणार आहे. प्रवासी आता या मार्गावरून अवघ्या ६ तास ४५ मिनिटांत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील, अशी माहिती दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. दिवा-चिपळूण मेमू सेवेच्या कायमस्वरूपी सुरूवातीमुळे कोकण परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कामकाज, शिक्षण आणि व्यापारी कारणांसाठी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असल्याने, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. Diva-Chiplun MEMU Local Permanent
