रत्नागिरी : माहे फेब्रुवारी 2022 मधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 07 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेत साजरा करण्यात येणार असल्याचे यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापी महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभाग यांजकडील दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजीच्या अधिसुचनेनुसार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजी दु:खद निधन झाल्याने सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. District Lokshahi Day on 8th Feb यास्तव सोमवार 07 फेब्रुवारी 2022 रोजी शासकीय सुटटी असल्याने माहे फेब्रुवारी 2022 मधील लोकशाही दिन मंगळवार दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी दु.1.00 ते 2.00 या वेळेत घेण्यात येईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. District Lokshahi Day on 8th Feb