गुहागर, ता. १६ : गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आयोजित रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरीचे ४८ वे सन २०२४-२०२५ वार्षिक अधिवेशन १८ जानेवारी ते दि. १९ जानेवारी या दरम्यान, पाटपन्हाळे येथील श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, श्रीपूजा कृषी पर्यटन केंद्र, खातू मसाले उद्योगसमोर आयोजित करण्यात आले आहे. District Library Association Convention in Guhagar
या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धाचे अध्यक्ष डॉ. गजानन जगन्नाथ कोटेवार यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण भवनचे प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नागिरीचे निरीक्षक हेमंत काळोखे, अध्यक्ष, श्रीकृष्ण साबणे, दिलीप कोरे, कोकण विभाग ग्रंथालय संघ रत्नागिरीचे ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक, ज्येष्ठ उद्योजक श्रीराम खरे, संभाजी सावंत, श्रीकांत पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र दळवी, राकेश आंबेरकर, राजेंद्र आरेकर, दत्तात्रय गुरव, सौ.मनाली बावधनकर आदी उपस्थित राहणार आहेत. District Library Association Convention in Guhagar


दि. १८ रोजी प्रतिनिधी नोंदणी व चहापान, अधिवेशन उद्घाटन समारंभ, स्वागतगीत, पाहुण्याचे स्वागत, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम कोळीनृत्ये, ड्रामाडान्स, जाकडी, फ्युजून डान्स, लावणी, भोजन
दि.१९ रोजी प्रतिनिधी नोंदणी आणि चहापान, ग्रंथदिंडी, व्याख्यान – मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि ग्रंथालय व्याख्यात्या – सौ. मनाली बावधनकर, कथा अभिवाचन श्रध्दा वझे, मुंबई, दु. २.३० ते ३.००: सार्वजनिक ग्रंथालये शंकासमाधान व खुले अधिवेशन व यानंतर रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाची सर्वसाधारण सभा होणार आहे. District Library Association Convention in Guhagar