गुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे आर्या मंदार गोयथळे व विवेक राजेंद्र बाणे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावून त्यांची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. District Level Question Manjusha Competition
रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येत असते. ही स्पर्धा गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी गुहागर तालुक्यातील आठ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर चे आर्या मंदार गोयथळे व विवेक राजेंद्र बाणे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावून रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आर्या गोयथळे व विवेक राजेंद्र बाणे यांना मनीषा सावंत या शिक्षकांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. District Level Question Manjusha Competition

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक सुजाता कांबळे, पर्यवेक्षक मधुकर गंगावणे, शिक्षक कृपाल परचुरे, राधा शिंदे, मनीषा सावंत आदींनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ व शाळेतील शिक्षक वृंदावनी अभिनंदन करण्यात आले व पुढील रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. District Level Question Manjusha Competition
