जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ; एकही दाखल अर्ज नाही
रत्नागिरी, ता. 18 : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी दिवसभरात एकूण २८४ नामनिर्देशन अर्ज घेतली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाले नाही. District Council, Panchayat Samiti Election

जिल्हा प्रशासनाने अधिसूचना विहित केल्यानुसार, राजपत्रासह, स्थानिक वृत्तपत्रे, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालये तसेच सर्व गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली. तसेच ही माहिती जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पंचायत समितीनिहाय स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत १६ ते २१ जानेवारी अशी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी २८४ व्यक्तींनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी, प्रत्यक्षात एकही दाखल झाले नाही. District Council, Panchayat Samiti Election