• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक टक्केवारी

by Manoj Bavdhankar
February 7, 2026
in Politics
90 1
0
District Council and Panchayat Samiti Election

पोलीस निरीक्षक सचिन सावंत वृद्ध मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाताना

177
SHARES
507
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची सकाळी मतदान टक्केवारी कमी असले तरी हे दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. आज सकाळी साडेनऊ पर्यंत 12.59% मतदान. साडेअकरा पर्यंत 29.77%, दुपारी दीड वाजेपर्यंत 42 .80% मतदान झाले.3.39 पर्यंत 50.24% मतदान झाले. District Council and Panchayat Samiti Election

असगोली गटात पुरुष 9170 स्त्री 10598 एकूण 19768, शृंगारतळी गटात पुरुष 8191 स्त्री 9329 एकूण 17520, कोंडकरूळ गटात पुरुष 8804 स्त्री 10128 एकूण  19022, वेळणेश्वर गटात पुरुष 8805 स्त्री 11467 एकूण 20272, पडवे गटात पुरुष 9145 स्त्री 11105 एकूण 20250 .या निवडणूक असलेल्या पाच गटात एकूण पुरुष मतदार 44 हजार 115 तर महिला मतदार 52 हजार 717 असे एकूण 96 हजार 832 मतदार आहेत. तर निवडणुकीसाठी पाच गटातून 12 उमेदवार व दहा गणातून 26 उमेदवार असे एकूण 38 उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व अपक्ष उमेदवार आपलं भवितव्य आजमवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. District Council and Panchayat Samiti Election

निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी १४५ मतदान केंद्रावर एकूण ६४० कर्मचारी तैनात करण्यात आले होते.  गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती साठी निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सुमारे १६० पोलिस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता मतांची आकडेवारी सुरू केली असून प्रत्येक उमेदवार आपण निवडून कसा येईल याची खात्री पटवून देत आहे. सहा ठिकाणी मशीन चा प्रॉब्लेम आला परंतु 24 होणार ऑफिसर असल्यामुळे त्या लवकरात लवकर बसून देण्यात आल्या. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील यांनी दिली. District Council and Panchayat Samiti Election

Tags: District Council and Panchayat Samiti ElectionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.