• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपाच्यावतीने ९ शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

by Guhagar News
July 24, 2025
in Guhagar
58 0
0
Distribution of notebooks on behalf of BJP to students
113
SHARES
324
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा उपक्रम

गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी भाजपाच्यावतीने काताळे-पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून साजरा करण्यात आला. हा वाढदिवस कोणतीही जाहिरात अथवा प्रसिद्धीचे कार्यक्रम न करता शैक्षणिक साहित्याचे वाटप किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक सहकार्य करून करण्याचे आवाहन देवेंद्रजींनी केले होत. Distribution of notebooks on behalf of BJP to students

Distribution of notebooks on behalf of BJP to students
Distribution of notebooks on behalf of BJP to students

त्यानुसार गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी प्रत्यक्ष जाऊन पडवे आणि काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नं १, तवसाळ अंगणवाडी, तांबडवाडी शाळा, बाबरवाडी शाळा, माध्यमिक विद्यालय पडवे, पडवे मराठी शाळा, काताळे शाळा नं.१, काताळे नवानगर शाळा, काताळे नवानगर उर्दु शाळा, केंद्रीय शाळा पडवे उर्दु या ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले. Distribution of notebooks on behalf of BJP to students

Distribution of notebooks on behalf of BJP to students

माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्मा.निरंजन जी डावखरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. काताळे आणि पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांना एकाच दिवशी शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम हा पहिल्यांदाच राबविला गेला. याबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि या दोन्ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांकडून निलेश सुर्वे यांचे कौतुक आणि आभारही व्यक्त केले. Distribution of notebooks on behalf of BJP to students

Distribution of notebooks on behalf of BJP to students

यावेळी काताळे ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, पडवे ग्रामपंचायत सरपंच मुजीफ जांभारकर, तवसाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश सुर्वे, पडवे विनायक भोसले, काताळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, जैद भाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लैबर जांभारकर, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, मदतनीस श्रीमती मनीषा मयेकर याचबरोबर जि. प.आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे राठोड सर, काताळे शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका माधवी पाटील मॅडम, कांबळे सर, नवानगरचे गुरसुळे सर,पडवे शाळेचे पावरी सर, संजय राठोड सर, तवसाळ बाबरवाडी शाळेचे कोकाटे सर, तवसाळ तांबडवाडी शाळेचे संदीप भोई सर, साईनाथ पुजारा सर, पडवे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. सूर्यवंशी, सहशिक्षक पी.जी. वेलुंडे, एस.एम.सूर्यवंशी, लिपिक राहुल कांबळे, प्रशांत सुर्वे, काताळे नवानगर उर्दूच्या मुख्याध्यापिका शाहीन मॅडम, उपशिक्षिका उजवा मॅडम, पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज अ.रशिद चिपळूणकर.  मुख्याध्यापक महमद सलीम अजगर कारभारी, सह शिक्षक रमजान फुरकान जांभारकर, दाऊद साहेब हमीद जांभारकर, शिक्षण सेविका जुलेखा इरफान हातवडकर, रुखसार या.गनि मेमन आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. Distribution of notebooks on behalf of BJP to students

Tags: Distribution of notebooks on behalf of BJP to studentsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.