गुहागर, ता.23 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. हे वाटप शनिवार दिनांक २५ जून रोजी कौंढर काळसूर येथील 3 शाळांमध्ये करण्यात येणार आहे. Distribution of literature by MNS

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदू जनायक राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, गुहागर मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप शनिवार दिनांक २५ जून रोजी करण्यात येणार आहे. काळसुर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, गट विभाग अध्यक्ष विक्रम जोयशी, उप गट अध्यक्ष नरेंद्र कदम, उपशाखा अध्यक्ष मनोहर जोयशी, सल्लागार संजय रामाणे, खजिनदार उत्तम जोयशी, महेश जोयशी, वाडी प्रमुख विलास वीर, विशाल जोयशी, निलेश तांबे, मनोहर मांजरेकर, गणेश विचारे, संदेश गोलंबडे यांच्या नेतृत्वाखाली कौंढर काळसुर येथील ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. Distribution of literature by MNS
