• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खैर रोपांचे चिपळूण येथे मोफत वाटप

by Manoj Bavdhankar
July 3, 2025
in Ratnagiri
134 2
0
Distribution of Khair saplings in Chiplun
264
SHARES
754
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ५ जुलै रोजी शेतकऱ्यांना वाटप

रत्नागिरी, दि. 03 : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूण येथे मोफत वाटप होणार आहे. शनिवार ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ११.३० वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रमही होणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रणजित गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी (प्रा.) गिरिजा देसाई यांनी दिली. Distribution of Khair saplings in Chiplun

यावेळी  गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,  विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.   या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे अतिथी उपस्थित राहणार आहेत. Distribution of Khair saplings in Chiplun

Tags: Distribution of Khair saplings in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share106SendTweet66
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.