संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्रामध्ये आज ३५ ते ४० वयोवृद्ध
जळगाव, ता. 30 : संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास केंद्र, जळगाव येथे २० लाभार्थ्यांना आय कार्ड वाटप करण्यात आले. शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या शुभ हस्ते या संस्थेचे आय कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी श्री. गणेश पाटील यांनी डॉ.उज्जैनकर यांचा वृक्षाचे रोपटे भेट देऊन सत्कार केला. Distribution of i-card at Jalgaon

संत गाडगेबाबा शहरी बेघर आवास संस्थेचे श्री गणेश पाटील यांनी हे बेघर आवास योजना सुरू केलेली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. श्री. पाटील हे स्वतः अपंग असून आज त्यांच्या बेघर आवास केंद्रामध्ये ३५ ते ४० वयोवृद्ध ज्यांना कोणी सहारा नाही ज्यांना घर नाही त्यांना आधार नाही अशांना श्री गणेश पाटील हे त्यांची आरोग्याची, भोजनाची, निवासाची सर्व सेवा करत आहेत. Distribution of i-card at Jalgaon

उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात उज्जैनकर सर म्हणाले की, आज-काल वृद्ध आई-वडिलांना मुलं वागवत नाहीत. म्हातारपणात अशा वृद्ध आई वडिलांचे हाल होतात, परंतु अशा अनाथ व गरजू वृद्धांना सहारा देणे ही आजच्या काळाची फार मोठी गरज असून पुण्ण्याचे काम आहे. यावेळी सर्व मान्यवरांनीही श्री गणेश पाटील यांच्या कार्याचे तोंड भरुन कौतुक केले. Distribution of i-card at Jalgaon
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश पाटील, श्री कुलकर्णी, श्री महाजन तसेच फाउंडेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष नंदलाल भोलाने, जळगाव जिल्हा दक्षता समितीचे महासचिव किशोर पाटील, किशोर नेवे आदी उपस्थित होते. Distribution of i-card at Jalgaon
