• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
July 23, 2022
in Guhagar
16 0
0
Distribution of goods on Fadnavis' birthday
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकोपयोगी वस्तूंचे वाटप

गुहागर, ता. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणतीही बॅनरबाजी अथवा दिमाखदार सोहळ्याचे आयोजन न करता समाज उपयोगी, लोकोपयोगी, सेवाभावी वृत्तीचे कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. त्याचे तंतोतंत पालन करत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले.  Distribution of goods on Fadnavis’ birthday

या कार्यक्रमाअंतर्गत शृंगारतळी येथील ग्राम आधार स्वयंसेवी संस्था संचलित जीवन ज्योती विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.  भाजपाचे उपाध्यक्ष आणि श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत (नाना) पालकर यांच्या माध्यमातुन वेळंब येथील आकस्मीत अपघाती निधन झालेले भाजपाचे कार्यकर्ते कै. महेश गुरव यांच्या २ पाल्याना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे गुहागर शहर भाजपाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. Distribution of goods on Fadnavis’ birthday

Distribution of goods on Fadnavis' birthday

अशा  प्रमुख तीन कार्यक्रमाव्दारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष संगम मोरे, भाजप गटनेते उमेश भोसले, सोशल मीडिया प्रमुख दीपक मोरे, उपाध्यक्ष यशवंत पालकर, राजा गुरव, समीर गावणंग, ज्योती परचुरे, संजय मालप, नेहा वराडकर, श्रद्धा घाडे आदि शहर भाजपा पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Distribution of goods on Fadnavis’ birthday

Tags: Distribution of goods on Fadnavis' birthdayGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.