गुहागर, ता. 25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने फळ वृक्ष वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा तालुका गुहागर येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू व होतकरु दिव्यांगांना फळ वृक्ष ( सुपारीची झाडे) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ सल्लागार विनायक ओक, चिपळूण यांनी फळवृक्ष वाटपासाठी सुपारीची १०० रोपे भेट दिली. Distribution of fruit trees on behalf of disabled rehabilitation organization

प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती दिली. तसेच गेली २३ वर्ष हा उपक्रम संस्था सातत्याने राबवित असल्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले. या संस्थेच्या निधी संकलन उपक्रमात गेले अनेक वर्ष उलेखनीय कार्य करत असलेल्या व नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या पालशेत हायस्कूलच्या पर्यवेक्षिका ढेरे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सल्लागारपदी महेंद्र देवळेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. Distribution of fruit trees on behalf of disabled rehabilitation organization

महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राशीनकर यांनी ही संस्था गेली तेवीस वर्ष विविध उपक्रमांबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष वाटप करून देशासाठी मोठे काम करत असल्याचे सांगितले. पालशेत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ढेरे यांनी संस्थेसाठी दहा खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या तसेच संस्थेचे नव निर्वाचित सल्लागार व पोमेंडीचे चे केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर यांनी संस्थेच्या कार्यक्रमासाठी एक हजार रुपये देणगी दिली. संस्थेचे सल्लागार प्रकाश बापट दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी व विविध उपक्रम राबवण्यासाठी निधीसकलन उपक्रमात गुहागर तालुक्यातील सर्व समाजाने एकत्र येऊन एक हात मदतीचा दिव्यांगांच्या विकासासाठी यथा शक्ती स्व इच्छेने देणगी स्वरूपात सहकार्य करावे, असे आव्हान यावेळी केले. Distribution of fruit trees on behalf of disabled rehabilitation organization

या कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ सल्लागार प्रकाश बापट, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, महेंद्र देवळेकर, केंद्रप्रमुख पोमेंडी व संस्थेचे सल्लागार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब राशीनकर, गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मोहन ढेरे, पालशेत हायस्कूलच्या पर्यवेक्षिका ढेरे, संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग आदी मान्यवर व मोठ्या संख्येने दिव्यांग सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य भरत कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहानी आंबेकर, शरद पाटील, निर्मला देवळे श्रवण रावणंग, ऋषभ खामकर यांनी विशेष प्रयत्न केले. Distribution of fruit trees on behalf of disabled rehabilitation organization
