गुहागर, दि.15 : तालुक्यातील आबलोली गावचे सूपूत्र पंकज प्रमोद वैद्य यांच्याकडून जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली नं.१ व आबलोली नं.२ या शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials in Aabaloli


पंकज वैद्य हे सध्या मुंबई येथे स्थायिक असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रांतीक सदस्य म्हणून काम करत आहेत. आबलोली गावाशी जोडलेली नाळ त्यांनी कायम राखली आहे. कोरोना काळात आबलोलीतील ग्रामस्थांना मास्क, सॕनिटायझर तसेच विविध प्रकारची औषधे वाटप केली होती. यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष श्री. विजय भोईटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी कक्ष अॕड. सायली सोनावणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials in Aabaloli
यावेळी सरपंच सौ. श्रावणी पागडे, माजी सरपंच विजय वैद्य, महेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, पोलिस पाटील महेश भाटकर, मुख्याध्यापिका श्रीमती प्रिया गुहागरकर, शिक्षका नंदा बाईत, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. नयना वैद्य, किरण वैद्य, अर्पिता वैद्य, शिक्षक संतोष मुंडेकर, अंगणवाडी सेविका प्रिया कदम, श्रीम. महाडीक, शंकर पागडे आदी उपस्थित होते. Distribution of educational materials in Aabaloli

