गुहागर, ता. 01 : जिल्हा परिषद केंद्र शाळा पडवे उर्दू येथे निर्मल ग्रामपंचायत पडवे कडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्या यांचे वाटप करण्यात आले. तसेच सरपंच मुजीब जांभारकर, ग्रामपंचायत सदस्य रफिक सारंग आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अमानत जांभारकर यांच्या शुभहस्ते शाळेय बॅग व वह्या वाटप करण्यात आले. Distribution of educational materials by Gram Panchayat


या समारंभात शाळेचे मुख्याध्यापक मुहम्मद सलीम कारबारी, वरिष्ठ शिक्षक रमजान जांभारकर, पदवीधर शिक्षक दाऊद जांभारकर, झुलेखा मॅडम, रुखसार मॅडम, अम्मारा मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. रमजान जांभारकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता दाऊद जांभारकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून केली. Distribution of educational materials by Gram Panchayat