गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेचे आयोजन
गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका अपंग पूनर्वसन संस्थेच्या वतीने फ़क्त गुहागर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगाच्या मुलांसाठी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. 12 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा, ता. गुहागर येथे घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सदर दिवशी उपस्थित राहावे. असे गुहागर तालुका अपंग संस्थेमार्फ़त कळविण्यात येत आहे. Distribution of educational materials

शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अनेक दात्यांच्या मदतीने संस्था गेली 20 वर्षे अविरतपणे राबवित आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व देणगीदार दात्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाला येताना विद्यार्थ्यांनी सोबत मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे मार्कलिस्ट व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत घेवून यावी. Distribution of educational materials
तरी सदरचे बातमी पत्र आपल्या परिसरातील गरजू विद्याथ्यापर्यंत पोचवून संस्थेला सहकार्य करावे, असे गुहागर तालुका अपंग संस्थेमार्फ़त कळविण्यात येत आहे. Distribution of educational materials
