गुहागर, ता. १६ : तालुक्यातील आदर्श शाळा दोडवली येथे श्री अशोक कांबळे यांच्या सहयोगाने जय अंबे मित्र मंडळ मालाड पूर्व येथील मंडळाने दि.११ जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन शाळेतील मुलांना वह्या, पेन,खाऊ व शाळेसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य दिले. दोडवलीचे मुख्याध्यापक श्री प्रकाश जोगळे सर, श्री सुमित बोबडे सर, श्री मंगेश कारंडे सर, श्री काशिनाथ माने सर सर्व विद्यार्थी वर्ग दोडवली गावचे ग्रामस्थ, महिला मंडळ यांनी आभार मानले. Distribution of educational material to Dodvali school


या कार्यक्रमाला उपस्थित जय अंबे मित्र मंडळाचे सदस्य अशोक कांबळे, विशाल सोने, दिनेश कांबळे, शैलेश भानसे,विलेश आडारकर,समिर आडारकर, विनय धोपटे, संजीव जगावाला, विशाल भानसे, संगेश भानसे, राकेश पागडे, रोषन लोंढे, मयुरेश चव्हाण, रितेश भानसे, अनिकेत वीर, सिद्धेश मुलम, पराग मुलम, तेजस आगरे, कमलेश आडारकर, दिपक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे याचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. Distribution of educational material to Dodvali school