• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका अपंग संस्थेत शैक्षणिक साहित्य वाटप

by Manoj Bavdhankar
June 17, 2025
in Guhagar
39 0
0
Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute
76
SHARES
218
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग संस्थेच्या वतीने गेली 23 वर्ष अविरतपणे दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगांची मुले तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षांमध्येही संस्थेमार्फत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी तालुक्यातील एकूण 146 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली, तसेच गेली 23 वर्ष हा शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी मा. श्री. प्रमोदजी गांधी साहेब, मनसे तालुका संपर्कप्रमुख, श्री. हेमचंद्र मोरे, शासकीय स्टॅम्प वेंडर गुहागर, श्री. योगेंद्रजी विचारे साहेब वरवेली,  श्री. पंढरीजी किर्वे साहेब-  अभिषेक एंटरप्राइजेस वरवेली, श्री. पापा जीवन संजीवनी ट्रस्ट मुंबई श्री. भाई बोरकर साहेब मुंबई, श्री. मुकुंद कानडे सर माजी मुख्याध्यापक चिपळूण, श्री. संतोषजी वरंडे सर अध्यक्ष जीवनश्री  प्रतिष्ठान गुहागर यांनी मोफत शैक्षणिक साहित्य पुरविले. या शैक्षणिक साहित्यामध्ये सर्व प्रकारच्या वह्या, कंपास बॉक्स, कलर बॉक्स, पेन इत्यादीचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये संस्था करीत असलेल्या विविध कार्याचा गुणगौरव केला. Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री विनायक ओक सर, श्री धोंडीये सर चिपळूण, मनसे  गुहागर तालुकाध्यक्ष श्री. सुनील हळदणकर साहेब, श्री. अनिलजी खांडेकर, अभिषेक एंटरप्राइजेस वरवेलीचे व्यवस्थापक श्री. दीपकजी झगडे व श्री. ज्ञानेश्वर झगडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. श्याम आठवले, संस्थेचे सल्लागार श्री. रवींद्र कुळये सर, पत्रकार श्री. गणेशजी कर्वे श्री. पाध्ये गुरुजी, सदस्य श्री. संतोष पालकर तसेच संस्थेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी आदी मान्यवर व दिव्यांग सभासद व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार व विद्यमान मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अनगूडे सर यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री. सुनील रांजणे, खजिनदार श्री. सुनील मुकनाक, संचालक श्री. अनिल जोशी, सौ. पुनम रावणंग, श्री. भरत कदम, श्री. संतोष घुमे, श्रवण रावणंग,  शंतनू रांजणे यांनी विशेष प्रयत्न केले. Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

Distribution of educational material in Guhagar Handicapped Institute

Tags: Distribution of educational material in Guhagar Handicapped InstituteGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.