रत्नागिरी, ता. 31 : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तूंचे वाटप केले. तसेच संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. Distribution of educational material and plantation by CA Institute
यावेळी रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार या संस्थेला प्रथमोपचार पेटी, घड्याळे, कात्री, चित्र काढण्यासाठी कागद, ब्रश जिलेटिन पेपर, पेपर कटर, स्केचपेन्स आदी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational material and plantation by CA Institute

अध्यक्ष सीए मुकुंद मराठे म्हणाले की, इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रत्नागिरी शाखा नेहमीच सामाजिक भान ठेवून काम करत असते व अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असते. आविष्कार करत असलेल्या कार्यासंबंधी कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अविष्कार संस्थेचे आभार मानले. आविष्कार संस्थेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. त्यांनी रत्नागिरी शाखेचे विशेष आभार मानले. Distribution of educational material and plantation by CA Institute
या वेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, विकासा चेअरमन सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर व आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सीए बिपिन शाह व आविष्कार कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर तसेच शामराव भिडे कार्यशाळेतील निदेशक, सीए इन्स्टिट्यूट शाखेतील लिपिक सोनल आंब्रे आदी उपस्थित होते. Distribution of educational material and plantation by CA Institute

