दुर्गादेवी देवस्थानच्या योजना कक्षाला दिली भेट
गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या योजना नोंदणी कक्षाला भेट दिली. तसेच 8 जणांना आभा कार्डचे वितरणही केले. Distribution of Abha Cards by Bawankules
भाजपच्या संपर्क ते समर्थन या अभियानाअंतगर्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज रायगड लोकसभा मतदारसंघात होते. अलिबाग येथून ते थेट गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीच्या हेलिपॅडवर उतरले. तेथे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे व गुहागर विधानसभाध्यक्ष माजी आमदार विनय नातू यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. त्यानंतर ते रानवी, गुहागर बाग मार्गे मोटारीने गुहागर वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आले. येथे दुर्गादेवीची पाद्य पूजा केली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुर्गादेवी देवस्थानने नवरात्र उत्सवानिमित्त सुरु केलेल्या योजना केंद्राला भेट देवून तेथील माहिती घेतली. यावेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, संतोष मावळंकर, गणेश भिडे, अद्वैत गोखले आदी विश्र्वस्तांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार केला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे शृंगारतळीला रवाना झाले. Distribution of Abha Cards by Bawankules
यावेळी माजी आमदार व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, गुहागर विधानसभा प्रमुख व माजी आमदार डॉ. विनय नातू, गुहागरचे शहराध्यक्ष संगम मोरे, गुहागर नगरपंचायतीचे माजी गटप्रमुख उमेश भोसले, संजय मालप, सौ. रश्मी पालशेतकर, सौ. ज्योती परचुरे, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील कार्यकर्ते उपस्थित होते. Distribution of Abha Cards by Bawankules
85 लाभार्थींनी घेतला लाभ
श्री दुर्गादेवी देवस्थानने नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस विविध शासकीय योजनांच्या नोंदणीसाठी मोफत नोंदणी केंद्र सुरु केले आहे. आजपर्यंतच्या 4 दिवसांत 81 आभा कार्ड, 3 इ श्रम कार्ड व 1 मतदार कार्ड वितरण या केंद्रातून झाले आहे. Distribution of Abha Cards by Bawankules