गुहागरमध्ये उपक्रम, फॉरएव्हर लिव्हिंग इम्पोर्टसचे सहकार्य
गुहागर, दि. 22 : कोविड–19 मुळे पालकांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात हातभार लावून त्यांचे शिकणे सुखकर करणे. या हेतूने रा. स्व. संघ, जनकल्याण समिती (Janakalyan Samiti) उत्तर रत्नागिरी जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील ज्या शाळांमध्ये प्रकल्प जातो अशा २१ शाळांमधील २५३७ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. Distribute notebooks in 21 schools

रा. स्व. संघ जनकल्याण समिती (Janakalyan Samiti) उत्तर रत्नागिरी. यांच्या मार्फत गुहागर तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प राबविला जातो . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे हे विद्यार्थी प्रयोगापासून वंचित राहतात. हे ओळखून फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत प्रकल्प शिक्षक शाळेत जाऊन इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात झालेले प्रयोग दाखविले जातात आणि त्याच्याकडून करून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होते. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. Distribute notebooks in 21 schools

याकरिता फॉरएव्हर लिव्हिंग इम्पोर्टस ( इंडिया ) (Forever Living Imports) प्रा. ली. कंपनी आणि त्यांचे मार्केटिंग मॅनेजर मार्व्हन पटेल, जनरलमॅनेजर स्मिता विचारे यांचे अनमोल योगदान लाभले.
या कार्यक्रमासाठी मार्केटिंग मॅनेजर मार्व्हन पटेल , जनरल मॅनेजर स्मिता विचारे , जिल्हा शिक्षण आयाम प्रमुख मनोहर पवार , प्रकल्प प्रमुख दिनेश जाक्कर , सदस्या पूजा कानिटकर, प्रकल्प शिक्षक रविंद्र खांडेकर , शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , ग्रामस्थ आणि शिक्षक उपस्थित होते. Distribute notebooks in 21 schools

