• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत

by Manoj Bavdhankar
April 24, 2022
in Guhagar
16 0
0
गुहागरमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

खंडीत आणि कमी दाबाने होणारा वीज पुरवठा कारणीभूत

गुहागर, ता. 24 : नगरपंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक महावितरणमुळे विस्कळीत (Disruption of water supply schedule) झाले आहे. अघोषीत भारनियमन आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे 10 एच.पी.चा पंप पुरेसा वेळ चालत नाही. त्यामुळे शहराच्या काही भागांना 2 ते 3 तासांच्या विलंबाने पाणी पुरवठा होत आहे.

Electric Supply Problem

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने उपकेंद्रापासून गुहागर तालुक्यातील 90 टक्के भागात लोटे मधुन वीज पुरवठा केला जातो. हा वीज पुरवठा करणाऱ्या फीडरची सध्या देखभाल दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे मार्गताम्हाने पासून संपूर्ण गुहागर तालुक्याला आरवलीमधुन वीज पुरवठा केला जात आहे. या वीजवाहिनीवर ग्राहकांची संख्या वाढल्याने पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही. त्यातच महावितरणने अघोषित भारनियमन सुरु केले आहे. उन्हाळ्यामुळे वीजेची वाढत्या मागणीप्रमाणे वीज पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसभरात ठराविक कालावधीत वीज पुरवठा बंद केला जातो. याचा परिणाम गुहागर शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. (Disruption of water supply schedule)

Disruption of water supply schedule

संपूर्ण गुहागर शहराला दुपारी 11 वाजेपर्यंत पाणी मिळाले पाहिजे. अशा पध्दतीने वेळापत्रक बनविण्यात आले आहे. दररोज रात्री मोडकाआगर येथून पंपाने पाणी उसपून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या भरल्या जातात.  हा पंप सकाळपर्यंत सुरु असतो. त्यामुळे पाणी वितरण सुरळीत होते. सध्या वीजेच्या खेळखंडोबामुळे रात्रीचे पाणी विनासायास भरले जाते. मात्र दिवस सुरु झाल्यानंतर कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पंप सुरु होत नाही. अशावेळी पंप सुरु झाल्यावर पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामुळे तेलीवाडी, कुंभारवाडी, वरचापाट ब्राह्मणवाडी, गुरववाडी, शिवाजी चौक, बौद्धवाडी, किर्तनवाडीचा काही भाग आदी 30 टक्के कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा विलंबाने होत आहे. (Disruption of water supply schedule)

दररोजच्या पाणी पुरवठ्यासाठी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना, पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. नगराध्यक्ष राजेश बेंडल, सातत्याने महावितरणशी संपर्क साधतात. नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा आणि पाणी पुरवठा समितीच्या सभापती प्रणिता बेंडल आपल्या सहकाऱ्यांसह दररोज मोडकाआगरला पंप हाऊसला भेट देतात. याबाबत नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, महावितरणमुळे विलंबाने पाणी पुरवठा होत असला तरी त्यांचे अधिकारी संपूर्ण सहकार्य करत आहेत. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असले तरी संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. 27 ते 28 एप्रिलपर्यंत लोटे फिडरचे काम पूर्ण होईल असे महावितरणने आम्हाला सांगितले आहे. (Disruption of water supply schedule)

Tags: Disruption of water supply scheduleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.