• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर क्रीडा संकुल १२ वर्षानंतरही अपूर्ण

by Ganesh Dhanawade
September 10, 2025
in Old News
147 2
0
Disinterest of Guhagar Sports Complex

देवघर येथील क्रीडा संकुल

289
SHARES
827
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

क्रीडा विभागाची अनास्था; स्पर्धा रस्त्यावर घेण्याची वेळ, आमदार लक्ष देणार का

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी माजी क्रीडा मंत्री, पालकमंत्री व विद्यमान आमदार भारकर जाधव यांनी देवघर येथे क्रीडा संकुल मंजूर करुन कामही सुरू झाले. मात्र २०१३ पासून सुरू झालेले हे क्रीडा संकुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने गेली १२ वर्षे हे संकुल केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. या संकुलामध्ये एकही क्रीडा प्रकार खेळवला गेला नसून जिल्हा क्रीडा विभागाने याकडे पूर्णतः पाठ फिरवली असून विद्यमान आमदार याकडे लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. Disinterest of Guhagar Sports Complex

जिल्हा क्रिडा विभागाकडून सुमारे १ कोटी रुपये निधी खर्च करून उभारण्यात येत असलेले हे क्रीडा संकुल गेली १२ वर्ष उभारण्यात येत आहे. या संकुलला रंगरंगोटी करण्यात आली होती. परंतु अद्याप उद्घाटन झालेले नाही. यामुळे अनेकवेळा क्रीडा स्पर्धा या संकुलाच्या बाजूला घेतल्या जातात. अॅथलेटिक्सच्या स्पर्धा तर गुहागर-चिपळूण मुख्य रस्त्यावर घेण्याची वेळ क्रीडा विभागावर आली होती. Disinterest of Guhagar Sports Complex

या संकुलावर खर्ची पडलेला निधी जरी सरकारी असला तरी सर्वसामान्याच्या करातून उभारलेला हा निधी आहे. तालुक्यात एकही क्रीडा संकुल नाही त्यामुळे गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील शहरापासून १८ कि.मी अंतरावर देवघर येथे या क्रीडा संकुलाची घोषणा झाल्यानंतर व प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तालुकावासियांच्या आशा पल्लवित झाल्या इमारत उभी तीही उपयोग शुन्य. Disinterest of Guhagar Sports Complex

बहुउपयोगी स्वरुपाच्या बनवण्यात आलेल्या या क्रीडा संकुलामध्ये टेबल टेनिस, हॅन्ड बॉल, करम, बुद्धिबळ यांसारख्या खेळाबरोबर जिमखानाही सुरू करण्यात येणार होता. परंतु केवळ इमारत उभी असून याचा उपयोग शुन्य अशी अवस्था आहे. या क्रीडा संकुलाबाहेर बास्केट बॉलसाठी उभारण्यात आलेले पॅनल सडले आहेत. २०० मीटरचा बनवलेल्या ट्रॅकवर तसेच इमारतीच्या सभोवती गवत व झाडी वाढली आहे. Disinterest of Guhagar Sports Complex

काम सुरू असताना या क्रीड संकुलाला गळती लागल्याने वॉटरप्रफिंग करण्यात आले. प्लंबिंगचे कामही पूर्ण आहे परंतु संकुलाला अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या तालुका क्रीडा स्पर्धा पार पडतात. परंतु एकही स्पर्धा या क्रीडा संकुलात घेण्यात आलेली नाही. यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या या क्रीडा विभागालाही ‘फाईल’ शोधण्याची वेळ आली आहे अजूनही क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने काम पूर्ण करून जिल्हा क्रीडा विभागाकडे सदर संकुल वर्ग केलेले नाही. असे असले तरी सदर क्रीडा संकुलावर खर्च कोतून करणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याने हा विषय धुळखात पडला आहे. गुहागरच्या क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात डागडुजी करावी लागणार आहे जिल्हा क्रीडा विभागाची अनास्था कारणीभूत ठरत आहे. Disinterest of Guhagar Sports Complex

आमदार भास्कर जाधव यांनी या क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न केले. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूर अधिवेशनाला जाण्याअगोदर या संकुलाला भेट देऊन पहाणी केली. जिल्हा क्रिडा अधिकारी यांची बैठक घेऊन यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कान २६ जानेवारी २०१५ रोजी याचे उ‌द्घाटन करण्याची तारीखही नक्की केली होती. परतु तेवढ्या कालावधीतही हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे त्यावेळचा काढलेला उद्घाटनाचा मुहूर्त हुकल्याने तो आजपर्यंत आलेला नाही. Disinterest of Guhagar Sports Complex

Tags: Disinterest of Guhagar Sports ComplexGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet72
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.