गुहागर, ता. 01 : तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार योग्य प्रमाणात आणि नियमितपणे मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या कार्यकर्त्यांनी गुहागर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे चर्चा करुन निवेदन सादर केले. Discussion on School Nutrition
मनसे कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये आहाराची अनियमित उपलब्धता, अन्नाचा निकृष्ठ दर्जा त्यामुळे विद्यार्थांचे आरोग्य आणि शिक्षणावर होणारे गंभीर परिणाम यावर चर्चा करण्यात आली. आणि यावर लवकरच शालेय पोषण आहार नियमित आणि चांगल्या प्रतिचा देण्याचे आश्वासन गटशिक्षण अधिकारी सर्व कार्यकर्त्यांना दिले. Discussion on School Nutrition

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश प्रदीप रायकर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष राहुल जाधव हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Discussion on School Nutrition