शहरातील विविध समस्यांवर केली चर्चा
गुहागर, ता. 03 : भाजपा शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपालिकेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे यांची विविध समस्यांवर भेट घेतली. या वेळी शहरातील नाले सफाई, गटार सफाई यावर प्रमुख चर्चा झाली. Discussion on issues in the city

शहर सरचिटणीस राम शिंदे यांनी गोवळकोट भागातील समस्यांवर चर्चा केली. युवामोर्चा शहराध्यक्ष निखिल किल्लेकर यांनी शिवनदी जवळील झोपडपट्टी मूळे होणाऱ्या त्रासाची तक्रार केली. नगरसेवक विजय चितळे यांनी शहरातील होणाऱ्या विकास कामांवर काही सूचना केल्या. नगरसेविका रसिका देवळेकर व नगरसेविका नुपूर बाचीम यांनी आपापल्या प्रभागातील प्रलंबीत विकास कामे व अस्वच्छता यावर चर्चा केली. शहर चिटणीस विनायक वरवडेकर यांनी पाग भागातील समस्यांवर चर्चा केली. शहराध्यक्ष आशिष खातू यांनी शहरातील नाले सफाई, प्रभागातील गटार सफाई, उक्ताड स्मशानभूमी, कानसेवाडी रस्ता यासंबंधी असलेल्या तक्रारींबद्दल चर्चा केली. Discussion on issues in the city
या वेळी शहराध्यक्ष आशिष खातू, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी नगरसेविका रसिकाताई देवळेकर, नुपूर बाचीम, शहर सरचिटणीस राम शिंदे, युवामोर्चा शहराध्यक्ष निखिल कील्लेकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदेश ओक, शहर सरचिटणीस परेश चितळे, विनायक वरवडेकर, मंदार कदम, श्री. मिरगल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी यांनी सर्व सूचनांची दखल घेऊन सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. Discussion on issues in the city
