झोंबडी सरपंचांचा पत्रकार परिषदेत खुलासा
गुहागर, ता. 15 : ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत काही ग्रामस्थांनी गेले काही दिवस आरोप करणे सुरु केलेले असून ते बिनबुडाचे व खोडसाळ असल्याचा आरोप झोंबडीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच सदस्यांना विश्वासात घेऊनच विकासकामे झाली असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आमच्याकडून झालेला नाही. त्यामुळे जनतेची दिशाभूल करुन विनाकारण आमची बदनामी केल्याचे स्पष्टीकरण सरपंच लांजेकर यांनी दिले. Disclosure of Zombadi Sarpanch in press conference
झोंबडी ग्रामपंचायतीच्या कारभारावर येथील ग्रामस्थ समीर तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला होता. यावरील झालेल्या आरोपांचे खंडन करताना सरपंच लांजेकर यांनी खुलासा केला की, सन २०२४-२५ च्या १५ वा वित्त आयोग आराखड्यामध्ये ४० हजार रु. च्या तरतुदीनुसार मुसलमान वाडीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने सुरुवातीला ५.५ फुटाचा बर्फाची लादीवाली शीतपेटीची मागणी केली होती. त्यावेळी मुस्लीम मोहल्ल्यातील सदस्य व ग्रामस्थांनी स्वयंचलित कॉम्प्रेसर वाली ६.५ फुटाची मोठी शीतपेटी घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे मासिक सभेमध्ये सर्व सदस्यांची चर्चा करुन १ लाख २५ हजाराची शवपेटी घेण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. त्यानुसार, शवपेटी खरेदी करुन ती झोंबडी मुसलमानवाडी येथील मशीदीच्या आवारात ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. Disclosure of Zombadi Sarpanch in press conference

ग्रामपंचायतीने ३२ हजार ९१६ रु. च्या शालेय वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये स्कँनर प्रिंटर १० हजार ५००, तीन शाळांमध्ये १० हजार ३८० चे मोठे ३ टेबल फॅन, शाळेतील मुलांना ७ हजार २०० रु.चे एलसीडी टॅबलेट पॅड ७२ नग आदी साहित्य खरेदी करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी पाणी सुविधा करण्यासाठी ७६ हजार ८१२ रु. चा खर्च अंदाजपत्रकानुसार, जि.प. शाळा नं.१ मध्ये काम पूर्ण झाले. त्या कामाचे शासकीय खात्याचे अभियंत्यांकडून मूल्यांकनही करण्यात आलेले आहे. या शाळेचे सलग तीन वर्षे अज्ञातांकडून पाईपलाईन तोडली जात असतानादेखील ग्रामपंचायतीने वेळोवेळी काम पूर्ण करुन दिले, असल्याचे स्पष्टीकरण सरपंच लांजेकर यांनी दिले. शाळा नं. ३ मध्ये रेन हार्वेस्टिंगचे अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झालेले आहे. सदर काम वाडीच्या सदस्याने सुचविल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ यांना सांगून काम करण्यात आलेले आहे. तसेच मूल्यांकनही करण्यात आलेले असल्याचा खुलासा करुन असे तथ्यहिन आरोप आमच्यावर केल्याचे लांजेकर यांनी स्पष्ट केले. Disclosure of Zombadi Sarpanch in press conference
दरम्यान, काही ग्रामस्थांनी मला अपशब्द व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. तसेच ग्रामसेवक सोनावणे यांना शिवीगाळ करत अंगावर धावूनही गेले. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. जे आरोप करुन आम्हाला धमक्या देत असून त्यांच्यावरच बलात्कार, विनयभंग, खून, चोरी, मारामारी, फसवणूक यांचे गुन्हे दाखल आहेत व त्यांनी जेलवारी केलेली आहे. असे असताना हे लोक आमच्यावरच आरोप करत असून त्यांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सरपंच लांजेकर यांनी स्पष्ट केले. Disclosure of Zombadi Sarpanch in press conference