• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 December 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन साजरा

by Guhagar News
December 4, 2025
in Guhagar
67 1
0
Disabled Assistance Day in Guhagar
132
SHARES
377
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दि. 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री दयानंद निकम साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था त्यांचे सहकारी श्री दत्तात्रय निकम, श्री अविनाश जाधव, संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री चिवेलकर सर, लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूलचे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री.चव्हाण साहेब, मुख्याध्यापक श्री शिरकर सर तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे श्री उमेश खैर तसेच संस्थेचे कार्यकारी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. Disabled Assistance Day in Guhagar

कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग यांनी जागतिक अपंग दिनाचे महत्व सांगितले. तसेच यावेळी दिव्यांग मंत्रालय यांनी सामाजिक प्रगतीसाठी सर्व प्रकारच्या दिव्यांगांना प्रोत्साहित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे या प्रकारचे यावर्षीची थीम असून सर्व घटकांनी यासाठी दिव्यांगांना सक्षम करण्याकरता पुढे आले पाहिजे. यावेळी संस्थेने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यात राबवणाऱ्या विविध उपक्रमाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. Disabled Assistance Day in Guhagar

Disabled Assistance Day in Guhagar

यावेळी ग्राहक संरक्षण कायदा व दिव्यांगांसाठी असणारे विविध कायदे याबाबत श्री दयानंद निकम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  तहसीलदार कार्यालयचे संजय गांधी विभाग प्रमुख श्री. वासावे साहेब यांनी दिव्यांगांना मिळणारी पेन्शन व अंतोदय योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सुरळीत पेन्शन सुरू होण्यासाठी सर्व दिव्यांगांनी आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र व यु डी आयडी कार्ड जमा करण्याचे आव्हान केले. शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांनी गुहागर तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्य करणारी संस्था म्हणून विशेष अभिनंदन केले. लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक श्री शिरकर सर यांनी ही संस्था नियोजनबद्ध कार्य करत असून संस्थेच्या माध्यमातून सर्वांसाठी विविध उपक्रम राबवित असलेबाबत संस्थेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी आपल्या शाळेमार्फत दिव्यांगांसाठी निधी संकलन करून जमा झालेल्या निधी रुपये 18000/- संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग  यांच्याकडे सुपूर्त केले. Disabled Assistance Day in Guhagar

Disabled Assistance Day in Guhagar

या कार्यक्रमामध्ये संस्थेचे खजिनदार श्री सुनील मुकनाक यांनी दिव्यांगांना मिळालेल्या बॅलन्स व्हील लावलेल्या गाडीवर  छोटे खाणी फिरतता स्टॉल स्वतः तयार करून दिव्यांगांना फिरता व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी मिळवून दिली आहे. गर्दीच्या ठिकाणी अगदी कमी जागेत  कोणताही व्यवसाय या फिरत्या स्टॉलमुळे सहज शक्य होणार आहे. त्यांनी या बनवलेल्या फिरत्या स्टॉलचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व प्रकारचे अनेक सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश अनगुडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य श्री संतोष कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार सुनील मुकनाक, सदस्य श्री अनिल जोशी, श्री भरत कदम, श्री अनंत घोरपडे, सौ सुहानी आंबेकर, श्री यशवंत पाष्टे, श्री अनंत पालकर, श्री. अनिल चाळके यांनी विशेष प्रयत्न केले. Disabled Assistance Day in Guhagar

Tags: Disabled Assistance Day in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.