• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्युत वाहिन्यांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था

by Guhagar News
May 26, 2025
in Guhagar
315 3
0
Underground power line works make roads dangerous
618
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना खारट हवामानामुळे विद्यृत वाहीन्यांचे लोखंडी पोल लवकर गंजतात तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि वादळवाऱ्यामुळे विद्यृत वाहीन्यांच्या पोलांची नेहमीच पडझड होऊन सतत लाईट जाणे अशा अनेक अडचणी उद्भवतात. यावर उपाय म्हणून शासनाच्या धोरणानुसार समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना भुमीगत विद्यृत वाहीन्या टाकून त्याद्वारे गावांतील ग्रामस्थांना वीज पुरवठा केला जाणार आहे. हा शासनाचा हेतु जरी चांगला असला तरी सदर कामांचे ठेकेदारांकडून पद्धतशीर पणे काम न करता कामामध्ये हेडसाड होताना दिसते आहे. गुहागर तालुक्यातील मोडकाआगर – वरवेली – पालशेत – अडूर – वेळणेश्वर – साखरी आगर – हेदवी – नरवण तसेच गुहागर आरे – वाकी या प्रमुख रस्त्याची दुरवस्था दिसत आहे. Dilapidated roads due to power line work

वास्तविक रस्त्याची साईटपट्टी आणि गटारलाईन सोडून भुमीगत विद्यृत वाहीनी (under ground electric cable) टाकणे अपेक्षित असते. परंतु गेले ६/७ महीने भुमीगत विद्यृत वाहीन्या टाकणाऱ्या ठेकेदारांकडून चक्क गटारातून  आणि साईट पट्टीतून खोदाई करून विद्यृत वाहीन्यां टाकलेल्या आहेत. शिवाय गटारे व  साईटपट्टया व्यवस्थित बुजविलेल्या दिसत नाहीत. वास्तविक सदर कामे चालू असताना सार्वजनिक  बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना योग्य त्या सुचना द्यायला हव्या होत्या. परंतु तसे केले की नाही ? आणि याला कुणाचा वरदहस्त आहे का ? हा खरा तर संशोधनाचा विषय आहे. आता तर सुरवातीलाच अवकाळी पावसाने रस्त्याची दुरवस्था होऊन अनेक ठिकाणे दगड-मातीचा थर रस्त्यावर पसरलेला दिसतो आहे. याची योग्य ती दखल घेऊन उपाय योजना न केल्यास दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचे सुद्धा रस्त्यावर घसरून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. Dilapidated roads due to power line work

गावातील नागरी सुविधांकडे लक्ष देणे हे काम बहुतांशी ग्रामपंचायतीं मार्फत केले जाते. परंतु अशी अनेक मोठी कामे ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना न कळविताच वरच्या पातळीवरून परस्पर परवानगी दिली जाते. गावातील ग्रामस्थ मात्र सरपंचांना विचारणा करतात, जाब विचारतात. अशा बाबतीत सरपंचांचा काही दोष नसताना विनाकारण ग्रामस्थांचे बोलणे सरपंचांना ऐकूण घ्यावे लागते की तुम्ही परवानगी कशी दिलीत. Dilapidated roads due to power line work या सगळ्या बाबींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन सदर रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदारांने केलेल्या चुका त्यांना दाखवून खोदलेली गटारलाईन व साईटपट्टया योग्य प्रकारे पुर्ववत करण्यास बंधनकारक करावे जेणे करून नागरिकांना आणि वाहनांना रस्त्यावरून प्रवास करताना अपघातांपासून वाचायला येईल. अशी विनंती उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.  Dilapidated roads due to power line work

Tags: Dilapidated roads due to power line workGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share247SendTweet155
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.