प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत आयोजन
गुहागर, ता. 05 : प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांच्यामार्फत दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्रावण पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे साखर, गुळ यांचा वापर न करता शुगर फ्री, न तळलेले तसेच कडधान्यांपासून चटपटीत तिखट पदार्थ बनवायचे होते. या स्पर्धेत सौ.दीक्षा दीपक आंबवकर यांनी आरोग्यदायी पौष्टिक शुगर फ्री नाचणीचे लाडू बनवून प्रथम क्रमांक मिऴवला. Diksha Ambawakar first in cooking competition
दीक्षा आंबवकर यांनी या लाडू मध्ये नाचणी पीठ, दूध, मखाणा, ड्रायफ्रुट, बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, तूप व वेळची पावडर यांचा वापर करून आरोग्यदायी पौष्टिक शुगर फ्री नाचणीचे लाडू तयार केले. या लाडूंपासून मानवी आरोग्यास खूप फायदे आहेत. नाचणी या तृणधान्यात कॅल्शियम, लोह, नायसिन, थायमिन या पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे खेळाडू, कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्ती, लहान मुले यांना नाचणीपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. Diksha Ambawakar first in cooking competition

नाचणी सेवनामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते, बद्धकोष्टता होत नाही, हृदयरोग, मधुमेह होण्याचा धोका कमी असतो, नाचणी हे तृणधान्य थंड असल्यामुळे उष्ण, व दमट हवामानाच्या प्रदेशात नाचणीचे पदार्थ मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात.,नाचणीच्या पदार्थांमुळे पित्त होत नाही. त्याच प्रमाणे मेंदूला चेतना देणारे अन्न घटक नाचणीमध्ये असतात. नाचणीची भाकरी लहान मुलांच्या वाढीच्या वयात ब्रेन टॉनिक आहे. हाडांचे आजार असणाऱ्यांना नाचणीपासून बनविलेले पदार्थ खाणे हा एक उत्तम पर्याय आहे., मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीयुक्त आहार खूपच गुणकारी आहे. Diksha Ambawakar first in cooking competition
आपल्या नेहमीच्या आहारात नाचणीचे सेवन खूपच कमी झाले आहे. लहान मुलांना चपाती, रोटी खायला जास्त आवडते. परंतु नाचणीची भाकरी लहान मुले खात नाहीत. कारण ही भाकरी रंगाने तांबूस रंगाची दिसते. परंतु त्या मध्ये असणारे पौष्टिक घटक शरीरासाठी किती उपयोगी आहेत याची माहिती नसते. त्यामुळे आहारामध्ये नाचणीचे सेवन केले जात नाही. अशा व्यक्तींच्या आहारात नाचणीचे सेवन केले जावे या साठी हे नाचणीचे आरोग्यदायी पौष्टिक लाडू उत्तम पर्याय आहे. हे लाडू सात्विक, पौष्टिक असून खायला खमंग आणि खूपच रुचकर आहेत. हे नाचणीचे लाडू आहेत हे खाताना आपल्याला कळणार देखील नाही. परंतु तुम्ही एकदा हा पौष्टिक लाडू खाल्लात तर पुन्हा पुन्हा नक्की खायला मागाल. याची खात्री सौ.दीक्षा दीपक आंबवकर यांना आहे. Diksha Ambawakar first in cooking competition
इतके सगळे आरोग्यदायी गुणधर्म असणारे नाचणीचे आरोग्यदायी पौष्टिक लाडू बनविण्यासाठी सौ.दीक्षा दीपक आंबवकर यांनी खूपच मेहनत घेतली असून त्यांची ही पाककला प्रबोधिनी विद्या प्रसारक संस्था चिपळूण यांनी घेतलेल्या श्रावण पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ठरली आहे. या संस्थेकडून सौ.दीक्षा दीपक आंबवकर यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी सौ.दीक्षा दीपक आंबवकर यांना सौ.शर्मिला पावसकर, सौ.कल्पना प्रभुदेसाई, सौ.राधिका पाथरे यांची मोलाची मदत झाली. स्पर्धेच्या उत्तम आयोजन सौ.मृणाल जोशी यांनी केले तर परीक्षक म्हणून श्रीमती विशाखा चितळे यांनी पाहिले. Diksha Ambawakar first in cooking competition