बिनविरोध निवड; गुहागरत प्रथमच उपाध्यक्षपद
गुहागर, ता. 24 : दि चिपळूण अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी गुहागर मधील धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे गुहागरात उत्साहाचे वातावरण आहे. चिपळूण अर्बन बँकेच्या स्थापनेनंतर प्रथमच गुहागरला उपाध्यक्ष पद मिळाला आहे. Dhananjay Khatu, Vice President of Chiplun Urban Bank
कोर कमिटी मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संचालक मंडळ यांनी ठरवल्याप्रमाणे धनंजय खातू यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणूक कार्यक्रम अध्यासी अधिकारी शांताराम चव्हाण, सहाय्यक निबंधक चिपळूण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज खातू यांचा आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. बँकेचे कोर कमिटी सदस्य सुचयशेट रेङीज, उमेश शेठ काटकर बँकेचे अध्यक्ष मोहन शेठ, मिरगल मावळते उपाध्यक्ष रहमान दलवाई बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष सतीश आप्पा खेडेकर, दिलीप दळी, तसेच बँकेचे सर्व संचालक सदस्य बँकेचे सीईओ तुषार सूर्यवंशी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाने धनंजय खातू यांचे अभिनंदन केले. Dhananjay Khatu, Vice President of Chiplun Urban Bank

या निवडीनंतर असगोली जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, नगरपालिकेचे नगरसेवक फैसल कासकर यांचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते. चिपळूण अर्बन बँक स्थापनेपासून प्रथमच गुहागरला उपाध्यक्ष पद मिळाल्यामुळे गुहागरतील सर्व स्तरातून धनंजय खातू यांचे अभिनंदन होत आहे. Dhananjay Khatu, Vice President of Chiplun Urban Bank
