संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील असोरे गावात बौध्दजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने अशोका विजयादशमी दिनी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. Dhammachakra Pravanta Day at Asore

यावेळी प्रथम गावातील जेष्ठ नागरिक शंकर सुर्वे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकविण्यात आला. तर जेष्ठ महिला सदस्या शेवंतीबाई सुर्वे यांनी पक्षध्वज फडकविला. यानंतर अनुभा सुर्वे, अमिता सुर्वे, अनिता सुर्वे, रुणाली सुर्वे, सखी सुर्वे यांनी उपस्थित उपासिक – उपासिकांसमवेत सामुहीक बुध्द वंदनेत सहभाग घेतला. धर्मदास पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. तसेच अरविंद सुर्वे, प्रकाश सुर्वे, मनोहर सुर्वे आणि साहिल सुर्वे यांनी यावेळी प्रबोधनात्मक विचार मांडले. प्रशांत सुर्वे यांनी प्रस्तावना मांडली. शेवटी आभार प्रदर्शन आणि अल्पोपहाराने सदर कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. Dhammachakra Pravanta Day at Asore

