मुंबई, ता. 02 : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी आयोजित पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आपल्या लेखी शुभेच्छा दिल्या आहेत. Shivamarathi Sahitya Sammelan
या शुभेच्छा पत्रात कळवले आहे की, हे संमेलन गोवा राज्यामध्ये होत असल्याने खूप आनंद वाटला आणि गावातील तळागळातील नवोदितांना या साहित्य संमेलनातून साहित्य निर्मितीसाठी नक्कीच बळ मिळेल. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कवी फ. मु. शिंदे यांनी सुद्धा या संमेलनाला शुभेच्छा देताना पत्रात म्हटले आहे की, उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या १४ वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यापैकी हे संमेलन म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी हा फार मोठा उपक्रम असल्याचे ते म्हणाले. Shivamarathi Sahitya Sammelan
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सुद्धा आपल्या लेखी शुभेच्छा पत्रामध्ये या संमेलनाला शुभेच्छा कळवलेल्या आहेत. उज्जैनकर सर यांचे हे कार्य गेल्या अनेक वर्षापासून सतत सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. मुक्ताईनगरचे शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे हे संमेलन गोव्यामध्ये होत असल्याचा खूप अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक पत्रकार तथा माजी प्राचार्य डी.बी. जगतपुरिया यांनी सुद्धा या संमेलनाला शुभेच्या कळविल्या आहेत. उज्जैनकर सरांचं हे कार्य सातत्यपूर्ण असून निस्पृह व प्रामाणिक आहे. सरांच्या विविध कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थिती देऊन त्यांची तळमळ प्रत्यक्ष बघितलेली आहे. समाजाविषयी व मराठी भाषा संवर्धनासाठी असलेल्या त्यांच्या तळमळीला व धडपडीला माझ्या मनापासून शुभेच्छा. Shivamarathi Sahitya Sammelan
लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ विचारवंत बी. जी. वाघ , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ता भोपाळ येथील चंद्रशेखर तापी, इंदूर येथील सुप्रसिद्ध कवी विश्वनाथ शिरढोनकर, सुप्रसिद्ध कथाकार डॉ. श्रीकांत तारे, बालकवी सुभाषचंद्र वैष्णव, ज्येष्ठ लेखक सुरेश पाचकवडे, बालकवी प्रा. देवबा शिवाजी पाटील, ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर कवी शशिकांत हिंगोणेकर, कवी चिंतामण शिरोळे, कवयित्री मनीषा रिठे या संमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. Shivamarathi Sahitya Sammelan