सर्व डाक कार्यालयांत रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू
गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त भावंडांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेली राखी देशाच्या कानाकोपऱ्यात वेळेवर पोहोचावी, यासाठी डाक विभागाने विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती अधीक्षक डाकघर ए. डी. सरंगले यांनी दिली. Department of Posts initiative for Rakshabandhan

या राखी पाकिटाची किंमत फक्त १२ रुपये आहे. या विशेष पाकिटाचा वापर करून राखी देशातच नव्हे तर विदेशातही पाठवता येणार आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण २३ हजार राखी पाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. बहिणीने पाठवलेली राखी वेळेत भाऊपर्यंत पोहोचावी यासाठी डाक विभागाने विशेष यंत्रणा सज्ज केली आहे. Department of Posts initiative for Rakshabandhan
राखी टपालावर विशेष लेबेल लावण्यात येणार असून, टपालाचे वर्गीकरण करताना त्या पाकिटांचे प्राथमिकतेने नियोजन करण्यात येईल. त्यामुळे राखी सणापूर्वीच राखी पोहोचण्याची हमी मिळणार आहे. अनेक वेळा बहिणींना प्रत्यक्ष जावून भावाच्या हातावर राखी बांधणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ही सेवा एक भावनिक पूल ठरते. अशा वेळी, डाक विभागाचे हे विशेष पाकीट प्रेम, आपुलकी आणि नात्याचा गोडवा राखून ठेवणारे माध्यम बनते. Department of Posts initiative for Rakshabandhan

डाक विभागाने केलेली ही सुविधा पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारी ठरते. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि भावंडांच्या नात्यातील गोडवा अधिक दृढ करावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे. Department of Posts initiative for Rakshabandhan