गुहागर, ता.16 : पं.स.गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी भाताची रोपे करण्यासाठी गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक निगुंडळ येथील शेतकरी वसंत मुकनाक यांच्या शेतावर दाखविण्यात आले. यावेळी सुधारीत जातीचे ‘वैष्णवी’ वाणाचे बियाणे पेरण्यात आले. Demonstration of rice sowing

यंदा पाऊस थोडा उशीराच आला. रोहिणी नक्षत्रात शेतकरी भाताची पेरणी करतात. अधेमध्ये वळीवाचा पाऊस येतो आणि रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे बियाणे रूजायला सुरूवात होते. मात्र यावर्षी रोहिणी कोरडाच गेला. एखाद- दुस-या सरी वगळताअजूनही पुरेसा पाऊस पडला नाही. भातं रूजायला पुरेशी सुरूवातही झाली नाही. सर्वत्र शेतकरी पारंपारीक पद्धतीने फेकून पेरणी करतात. Demonstration of rice sowing

सुधारीत जातीचे ‘वैष्णवी’ वाणाचे 6 किलो बियाणे या गादिवाफ्यासाठी वापरण्यात आले. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने 4 पायली म्हणजेच 12 किलो एवढे बियाणे पूर्वी शेतकरी पेरत असत. मात्र या बियाण्यांपैकी बरेच बियाणे उगवत नसे. रोपे काढायच्या वेळीही रोपे तुटून रोपांचे नुकसान होत होते. तयार झालेली रोपे लावणीसाठी (दाढ) काढताना अधिक कष्ट घ्यावे लागतात. मजूरांची संख्याही अधिक लागते. गादिवाफ्यावर रोपे तयार केल्यास सुरूवातीला गादी वाफे तयार करायला थोडा वेळ लागत असला तरीही लावणीच्या वेळचे श्रम व वेळ मात्र वाचतो. 3 फूट रुंद असलेल्या 5 गादिवाफ्यावर भाताच्या बियाणे पेरणीचे प्रात्यक्षिक शेतकरी वसंत मुकनाक यांच्या शेतावर दाखविण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी मार्गदर्शन केले. Demonstration of rice sowing

‘चला करूया पेरणं’ असं म्हणत पं.स. गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी निगुंडळ येथील शेतकरी वसंत मुकनाक यांच्या शेतावर भाताची रोपे तयार करण्यासाठी गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. Demonstration of rice sowing
