भाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : गौरी गणपतीच्या सणाची धार्मिक भावना लक्षात घेऊन, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, होणारे अपघात लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि जीवि – वित्तहानी टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक व खोदाई या १५ दिवसाच्या कालावधीमध्ये सक्तीने बंद होण्याची कारवाई तातडीने करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी केली आहे. याबाबत लेखी निवेदन मान. तहसीलदार, मान. पोलीस निरीक्षक गुहागर, मान. उप अभियंता सां.बां. विभाग गुहागर, मान. उपकार्यकारी अभियंता म.रा. वी. वी. कंपनी गुहागर, मान. कोकण एलएनजी कंपनी यांना देण्यात आले आहे. Demand to stop excavation along the road

कोकणवासीयांचा आत्मीयतेचा गौरी गणपती हा धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या सणानिमित्त मुंबई, पुणे व तत्सम शहरातून गुहागरकडे येणारा चाकरमन्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात असतो. यावेळी महामंडळाच्या नियमित व जादा गाड्या, विविध शहरातून गुहागरकडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक गाड्या यांचे प्रमाण फार मोठे असते. या व्यतिरिक्त दुचाकींचा वापर वाढलेला असतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने येणारे चाकरमनीही मोठ्या प्रमाणात असतात. या कालावधीत गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीतून निर्यात होणाऱ्या गॅसची वाहतूक, गुहागर मधून इतर राज्यात जाणारा जांभा दगड, गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी येणाऱ्या मालवाहतुकीच्या गाड्या या व्यतिरिक्त तालुक्यात अन्य होणारी अवजड वाहतूक दिनांक २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या १५ दिवसाच्या कालावधीसाठी बंद करण्यात यावी. Demand to stop excavation along the road

त्याचबरोबर गुहागर तालुक्यामध्ये महावितरणची टाकण्यात येणारी भूमिगत केबल त्यासाठी होणारी रस्त्यालगतची धोकादायक खोदाई व एअरटेल या भ्रमणध्वनीच्या कंपनीकडून टाकण्यात येणारी केबल यासाठी होणारी खोदाई या दोन्ही खोदाई या गौरी गणपतीच्या सणांमध्ये वाहनांची व चाकरमान्यांची गाड्यांसहित होणारी गर्दी लक्षात घेता हे खोदाईचे काम सुद्धा १५ दिवस बंद ठेवणे अत्यावश्यक आहे. Demand to stop excavation along the road