भुवडवाडीने केली ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी
गुहागर, ता.10 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते गुहागर तालुक्यातील परचुरी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. गावातील भुवडवाडी येथील रहिवाशी गंगाराम भुवड हे ७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी गंगाबाई हीचे कुंकू फुसने, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे. या पूर्वांपार चालत आलेल्या प्रथांची अमंलबजावणी न करता परचुरी भुवडवाडीने ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे पालन केले आहे. Decision to stop widow practice in Parchuri

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत, परचुरी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतने केलेली ही कृती स्तुत्य आहे. आज विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो. तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या प्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. Decision to stop widow practice in Parchuri

अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन परचुरी भुवडवाडी यांनी केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे. Decision to stop widow practice in Parchuri