पेवे गावातील प्रकार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
गुहागर, ता. 28 : यापुढे ग्रामपंचायतीमध्ये दिसलात तर तुमचे कपडे फाडून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू. आम्ही दाऊदची माणसे आहोत. अशा प्रकारे अश्लील शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुहागर तालुक्यातील पेवे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गावातील शौकत महमद खान, मुनाफ युसुफ खान व निलेश मुरलीधर किर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Death threat to Peve Gram Panchayat members
अधिक माहिती अशी की, दि. १९ ऑक्टोबर सायंकाळी ४ वा. दरम्यान पेवे ग्रामपंचायतीची सभा संपली. सभा संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाहेर शौकत महमद खान, मुनाफ युसुफ खान व निलेश मुरलीधर किर यांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांना पाहुन शौकत महमद खान याने आज तुमची शेवटची सभा आहे, असे समजा. यापुढे तुम्ही पंचायतीमध्ये दिसलात तर तुमचे कपडे फाडुन तुम्हाला धक्केमारून बाहेर काढीन. मी दाऊदचा माणुस आहे. मी धावत्या हिरणीला मारतो, तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही. माझ डोक गरम आहे, मी मागेपुढे पाहत नाही. महिला असो की, पुरुष असे बोलून या दोघींना आई बहिणीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुमच्या नव-यांना बोलवा, त्यानाही आम्ही तीघे ठार मारून टाकु अशी धमकी देवुन मुनाफ युसुफ खान व निलेश मुरलीधर किर यांनीही शौकत खानच्या म्हणण्याला दुजोरा देवुन सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. Death threat to Peve Gram Panchayat members
याबाबत सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांनी मंगळवारी २४ रोजी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, ५०६, ३४ अन्वय गुन्हा दाखल केला आहे. Death threat to Peve Gram Panchayat members